दक्षिण व्हियेतनाम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
व्हियेतनामचे प्रजासत्ताक
Việt Nam Cộng hòa (व्येतनाम चोंग-होआ) |
||||||
|
||||||
|
||||||
![]() |
||||||
| राजधानी | सायगाँ | |||||
| सर्वात मोठे शहर | तो क्वॉक - दाहर दू - त्राच नेह्म(१९५४-६७) (पित्रृप्रदेश-सत्कार-जबाबदारी) तो क्वॉक - काँग मिन्ह - लिएम चिन्ह(१९६७-७५) (पित्रृप्रदेश-न्याय-एकता) |
|||||
| शासनप्रकार | प्रजासत्ताक | |||||
| राष्ट्रप्रमुख | -१९५५-६३ न्गो दिन्ह दिएम -१९६३-७५ न्गुयेन वान थिउ |
|||||
| अधिकृत भाषा | व्हियेतनामी, फ्रेंच | |||||
| क्षेत्रफळ | १,७३,८०९ वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | १९,५८२,००० | |||||
| लोकसंख्या घनता– | २९१.८/चौ.किमी. प्रती वर्ग किमी | |||||
दक्षिण व्हियेतनाम (व्हियेतनामी: Việt Nam Cộng hòa, व्येतनाम चोंग-होआ) हा आग्नेय आशियातील वर्तमान व्हियेतनामाच्या दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५०च्या दशकात याला "व्हियेतनामचे राज्य" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हियेतनामचे प्रजासत्ताक" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. सायगाँ येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४च्या जिनिव्हा परिषदेत व्हियेतनामाची साम्यवादी व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर "दक्षिण व्हियेतनाम" व "उत्तर व्हियेतनाम" अशा संज्ञा रूढ झाल्या. व्हियेतनाम युद्धात दक्षिण व्हियेतनाम अमेरिकेच्या बाजूने सहभागी झाला.
बाह्य दुवे [संपादन]
- व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९५६) (पीडीएफ). (इंग्लिश मजकूर)
- व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९६७). २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (व्हियेतनामी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
