अमेरिकन डॉलर
| अमेरिकन डॉलर | |
| United States dollar | |
| अधिकृत वापर | |
| इतर वापर | |
| संक्षेप | US$ |
| ISO 4217 कोड | USD |
| विभाजन | १०० सेंट |
| नोटा | $1, $5, $10, $20, $50, $100 |
| नाणी | 1¢, 5¢, 10¢, 25¢ |
| बँक | फेडरल रिझर्व्ह बँक |
| विनिमय दरः १ २ | |
अमेरिकन डॉलर (इंग्रजी: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक (Federal Reserve: इंग्रजी आवृत्ति) या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 (इंग्रजी आवृत्ति) प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund: इंग्रजी आवृत्ति) प्रमाणे संबोधन US$ असे आहे.
१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज (इंग्रजी बाह्यदुवा) इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते ( इंग्रजी बाह्यदुवा).
संयुक्त संस्थाने हा "डॉलर" या नावाचे चलन वापरणार्या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. (पहा: डॉलर)
[संपादन] संदर्भ
- ↑ US Dollar and Pakistani rupee are widely accepted.
- ↑ Alongside Cambodian Riel
- ↑ Alongside East Timor centavo coins
- ↑ Alongside Ecuadorian centavo coins
- ↑ Salvadoran colón is now used only by some banks in few electronic transactions.
- ↑ Alongside Panamanian balboa coins
- ↑ Alongside Zimbabwean dollar (suspended indefinitely from 12 April 2009), Euro, Pound Sterling, South African rand and Botswana pula. The US Dollar has been adopted as the official currency for all government transactions.
[संपादन] हेही पाहा
- डॉलर - निसंदिग्धकरण
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |