"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २८०: | ओळ २८०: | ||
‘अबीर गुलाल’, ‘अ फेअर डील’, ‘ऑल दि बेस्ट, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘इंदिरा’, ‘कळत नकळत’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘गोष्ट तशी गमतीची’, जन्मरहस्य’, ‘ठष्ट’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘ढोलताशे’, ’दी दोघं’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’ ‘लगीनघाई’, 'वाडा चिरेबंदी’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘श्री बाई समर्थ’, ’सही रे सही’, ‘स्पिरीट’, ‘सुस्साट’, ‘सेल्फी’, ‘हा शेखर खोसला कोण आहे’, वगैरे. (अपूर्ण यादी) |
‘अबीर गुलाल’, ‘अ फेअर डील’, ‘ऑल दि बेस्ट, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘इंदिरा’, ‘कळत नकळत’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘गोष्ट तशी गमतीची’, जन्मरहस्य’, ‘ठष्ट’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘ढोलताशे’, ’दी दोघं’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’ ‘लगीनघाई’, 'वाडा चिरेबंदी’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘श्री बाई समर्थ’, ’सही रे सही’, ‘स्पिरीट’, ‘सुस्साट’, ‘सेल्फी’, ‘हा शेखर खोसला कोण आहे’, वगैरे. (अपूर्ण यादी) |
||
==आधुनिक मराठी नाटककार== |
==आधुनिक मराठी नाटककार व त्यांचे एखादे नाटक)== |
||
अतुल पेठे, अनिल दांडेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशुतोष पोतदार, इरफान मुजावर, किरण यज्ञोपवीत, केदार शिंदे, चैतन्य सरदेशपांडे, तुषार भद्रे, दिलीप जगताप, धर्मकीर्ती सुमंत, डॉ. निलेश माने, प्रदीप वैद्य, प्राजक्त देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, महेश एलकुंचवार, मिहिर राजदा, युगंधर देशपांडे, राजकुमार तांगडे, राजन देऊसकर, |
अतुल पेठे, अनिल दांडेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशुतोष पोतदार, इरफान मुजावर (नंगी आवाजे), किरण यज्ञोपवीत, केदार शिंदे, चैतन्य सरदेशपांडे, तुषार भद्रे (लादेनच्या शोधात), दिलीप जगताप, धर्मकीर्ती सुमंत, डॉ. निलेश माने, प्रदीप वैद्य, प्राजक्त देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, महेश एलकुंचवार, मिहिर राजदा, युगंधर देशपांडे (दीर्घांक- अगदीच शून्य प्रयोग), राजकुमार तांगडे (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला), राजन देऊसकर, राजीव मुळे (बैल-अ-बोलबाला), विद्यासागर अध्यापक (दर्द-ए-डिस्को), संतोष गुर्जर, सौरभ पाटील, हिमांशू स्मार्त |
||
२३:११, २८ मे २०१९ ची आवृत्ती
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक , अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात आलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.
नाटकाचा इतिहास
भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत. इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखन ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो. संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. 1912 मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि उरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालीदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशिय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शुद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारंमध्ये भवभूती (उत्तररामचरित), विशाखादत्त (मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत असत.
नाट्यकोश
मुख्यत्वे मराठी भाषेतील नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
नाटकांचे लांबीनुसार वर्गीकरण
- नाट्यछटा (प्रयोग कालावधी काही मिनिटे)
- एकांकिका (३० ते ४५ मिनिटे)
- दीर्घांक (सव्वा ते दीड तास)
- लघुनाटक/नाटिका (सव्वा ते दीड तास)
- नाटक (तीन ते सहा तास)
- दीर्घ नाटक (प्रयोग कालावधी ९ तास)
- नाट्यत्रयी (३ नाटकांना लागणारा कालावधी)
नाट्यांतर्गत काळावरून वर्गीकरण
- पौराणिक (उदा० सौभद्र)
- मिथकाधारित (ययाति)
- ऐतिहासिक (उदा० भाऊबंदकी)
- अनैतिहासिक-ऐतिहासिक (उदा० घाशीराम कोतवाल)
- सामाजिक (उदा० भावबंधन)
- कौटुंबिक (बाळ कोल्हटकरांची नाटके)
- भविष्य-नाटक (फ्युचरिस्ट प्ले, उदा० चारशे कोटी विसरभोळे)
- फँटसी (अद्भुतरम्य नाटक, उदा० जादूचा शंंख))
- विशिष्ट काळ नाट्य/प्रासंगिक नाटक (उदा० शारदा; डॉक्टर लागू; तो मी नव्हेच)
- राजकीय नाटक (स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर नाटक) (उदा० कीचकवध; संन्यस्त खड्ग; मी नथूराम बोलतोय)
- शोकात्मिका (उदा० सवाई माधवरावांचा मृत्यू)
- सुखात्मिका (उदा० तुझे आहे तुजपाशी)
नाट्यलेखन काळावरून वर्गीकरण
- अभिजात नाटक (क्लासिक)
- मॉडर्न (आधुनिक) नाटक
- मॉडर्न-क्लासिक स्थल-कालातीत नाटक (उदा० तमाशा, लोकनाट्य, दशावतार)
- अलिखित तत्कालस्फूर्ती नाटक (सोंगाड्याची बतावणी)
नाट्यस्थळावरून वर्गीकरण
- पथनाट्य
- परिसर रंगभूमी
- रिंगण नाट्य
- रंगमंच नाटक
- निकट-मंच नाटक
- देवळात, पटांगणात, जत्रेत, झाडाच्या पारावर वा तंबूत होणारी लोकनाट्ये
नाट्यसंगीत
मराठी संगीत नाटकांच्या उत्कर्षकाळात मराठी नाट्यसंगीत या नावाचा एक नवाच गीतप्रकार उदयास आला. मराठी नाट्यसृष्टीची शताब्दी झाली तरी संगीताचा हा प्रकार महाराष्ट्रात अजूनही लोकप्रिय आहे. मराठीत नाट्यसंगीताचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.
मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[१]
संगीत मराठी नाटके
विष्णुदास भावे हे आद्य संगीत नाटककार होते.
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील पदे अनेकदा अन्य गायकांकडून गायली जातात.
प्रायोगिक रंगभूमी
मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
नटसम्राट
मराठी नाटकांमध्ये गाजलेल्या नाटकांत नटसम्राट हे नाटक खूप चर्चिले जाते. हे नाटक शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणे हे एक आव्हान समजले जाते. फारच थोड्या नटांनी ते स्वीकारले आणि यशस्वीरीत्या पार पाडले. श्रीराम लागू, दत्ता भट, दत्ता मयेकर, मोहन जोशी, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हे त्यांपैकी काही अभिनेते होत. ह्या नाटकावर एक मोठा चित्रपटही झाला. त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारली होती. नटसम्राट नाटकाचे हिंदी रूपांतरही झाले आहे. त्यात अप्पा बेलवलकरांची भूमिका आलोक चटर्जी करतात. ३० मे २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या या नाट्यप्रयोगानंतरच्या नाट्यप्रसंगाचे वर्णन येथे वाचता येईल.
नाटकांचे प्रकार
- अतिनाट्य (मेलोड्रामा)
- अभिजात नाटक
- असंगत नाट्य (न-नाट्य)
- आधुनिक अभिजात नाटक
- एकपात्री नाटक
- एकांकिका
- ऐतिहासिक नाटक
- कलावादी नाटक
- गद्यनाटक
- चर्चानाट्य
- चित्रनाट्य
- जीवनवादी नाटक
- तमाशा
- त्रिनाट्यधारा (नाट्यत्रयी)
- दशावतार
- दूरचित्रवाणी मालिका
- दीर्घनाटक
- दीर्घांकिका
- न-नाट्य (असंगत नाट्य)
- नभोनाट्य (श्रुतिका)
- नाटिका
- नाट्यछटा
- नाट्यत्रयी (त्रिनाट्यधारा)
- नाट्यवाचन
- नुक्कड नाटक
- नृत्यनाटिका (बॅले)
- पथनाट्य
- पुरुषपात्रविरहित नाटक
- पौराणिक नाटक
- प्रहसन (फार्स)
- प्रायोगिक नाटक
- फिजिकल नाटक
- बालनाट्य
- बाहुली नाट्य (कठपुतळी)
- बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
- भक्तिनाट्य
- भयनाट्य
- भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
- भाण किंवा मिश्र भाण : एक प्रकारचे संस्कृत एकपात्री नाटक
- भारूड
- महानाट्य : रंगमंचावर सादर न करता येण्यासारखे मैदानावर करायचे नाटक
- मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
- मुक्तनाट्य
- मूकनाट्य
- रिंगणनाट्य
- लघुनाटक
- लळीत
- लोकनाट्य
- वास्तववादी नाटक
- विधिनाट्य
- विनोदी नाटक
- विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
- विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
- व्यक्तिकेंद्री नाटक
- शोकात्मिका
- स्त्रीपात्रविरहित नाटक
- श्रुतिका (नभोनाट्य)
- संगीत नाटक
- संगीतिका (ऑपेरा)
- समस्याप्रधान नाटक
- समूहकेंद्री नाटक
- साभिनय नाट्यवाचन
- सामाजिक नाटक
- सुखात्मिका
- सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)
- क्षोभ नाट्य
बहुभूमिका नाटके
नाटक, आणि त्या नाटकात एकाच व्यक्तीची अनेक रूपे सादर करणारे अभिनेते: -
- गंमत जंमत (अरुण नलावडे + रसिका ओक + सोनाली चेऊलकर(?))
- चार दिवस प्रेमाचे (दहा भूमिका, सविता प्रभुणे + प्रशांत दामले)
- चूक भूल द्यावी घ्यावी (तीन भूमिका, निर्मिती सावंत)
- जस्ट हलकंफुलकं (५ भूमिका, विजय कदम + रसिका ओक); (सागर कारंडे + अनिता दाते)
- तू तू मी मी (१४ भूमिका, विजय चव्हाण); (संतोष पवार)
- तो मी नव्हॆच (प्रभाकर पणशीकर)
- प्यार किया तो डरना क्या (३ भूमिका)
- थरार (दोन भूमिका, सतीश पुळेकर)
- बहुरूपी प्रशांत दामले (२ भूमिका, प्रशांत दामले)
- बे दुणे पाच (पाच भूमिका, प्रशांत दामले)
- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (२ भूमिका)
- श्रीमंत दामोदर पंत (२ भूमिका)
- सही रे सही (४ भूमिका, भरत जाधव)
- हसवाफसवी (सहा भूमिका, दिलीप प्रभावळकर); (पुष्कर श्रोत्री)
रंगभूमीचे प्रकार आणि शाखा
- आसामी रंगभूमी
- उर्दू रंगभूमी
- एलिचपूरची नाट्यपरंपरा
- ओरिसा रंगभूमी
- कानडी रंगनभूमी
- कामगार रंगभूमी
- गुजराती रंगभूमी
- ग्रिप्स थिएटर
- ग्रीक रंगभूमी
- झाडीपट्टीची रंगभूमी
- तंजावरी रंगभूमी
- तामीळ रंगभूमी
- तिसरी रंगभूमी
- तेलगू रंगभूमी
- दलित रंगभूमी
- निमव्यावसायिक रंगभूमी
- नुक्कड नाट्य
- पंजाबी रंगभूमी
- पथनाट्य
- परिसर रंगभूमी
- पारसी रंगभूमी
- प्रचार रंगभूमी
- प्रसार रंगभूमी
- प्रायोगिक रंगभूमी
- प्रौढ रंगभूमी
- बंगाली रंगभूमी
- बाल रंगभूमी
- ब्लॅक रंगभूमी
- भक्तिनाट्य
- मल्याळी रंगभूमी
- रिंगणनाट्य
- लोककला रंगभूमी
- विधिनाट्य
- विद्यार्थी रंगभूमी
- व्यस्ततावादी रंगभूमी
- व्यावसायिक रंगभूमी
- शालेय रंगभूमी
- संस्कृत रंगभूमी
- समांतर रंगभूमी
- सिंधी रंगभूमी
- स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी]])
- हिंदी रंगभूमी
- हौशी रंगभूमी
नाट्यशास्त्र अध्यापन संस्था
- ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नाट्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद.
- इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ॲन्ड रिसर्च (IAPAR), पुणे. (२०१७ सालचे संचालक - प्रसाद वनारसे)
- चतुरंग प्रतिष्ठान, पुणे
- नाट्यसंस्कार कला अकादमी
- भरत नाट्यसंशोधन मंदिर, पुणे
- मॉडर्न महाविद्यालय, पुणे
- ललितकला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
- शिक्षकांसाठी अभ्यासनाट्य शिबीर : ही शिबिरे हे अनेक संस्था भरवतात. असे एक शिबीर, पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भरवले होते.
- विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान : नाट्यसंगीतातली पदवी आणि पदविका देणारी संस्था
नाट्य महोत्सव
महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. असे काही नाट्य महोत्सव --
- अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे इ.स. १९०५ पासून भरत आले आहे.
- दैनिक सकाळ आयोजित नाट्यमहोत्सव
- पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव
- पु.ना. गाडगीळ ज्युवेलर्स पुरस्कृत नाट्यमहोत्सव
- पुणे नाट्यसत्ताक महोत्सव (इ.स. २०१६पासून)
- पृथ्वी थिएटर्सचा आंतरराष्ट्रीय थेप्सो नाट्य महोत्सव
- मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचा वार्षिक नाट्यमहोत्सव (१९७३पासून), औरंगाबाद
- महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव (इ.स.. १९६१पासून)
- मुंबई विद्यापीठाच्या "ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्स "या नाट्यप्रशिक्षण संस्थेचा दरवर्षी होणारा "राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव" (इ .स. २००४पासून) मुंबई
- विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे
- कांकरिया करंडक बालनाट्य स्पर्धा, अहमदनगर
- चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
- दादा कोंडके करंडक नाट्य एकांकिका आणि एकपात्री स्पर्धा
- दीर्घांक स्पर्धा
- दैनिक लोकसत्तातर्फे चालणाऱ्या लोकांकिका नावाच्या एकांकिका स्पर्धा
- दैनिक सकाळ सोशल फाउंडेशनच्या ’आंतरशालेय सकाळ नाट्यवाचन स्पर्धा’ आणि शिक्षकांसाठी ’सकाळ नाट्यलेखन स्पर्धा’
- फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा
- पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा
- पुणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघ घेत असलेली आंतरशालेय (यशवंतराव चव्हाण) बालनाट्य स्पर्धा (इ.स. १९६०पासून)
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वार्षिक राज्य नाट्य स्पर्धा (इ.स. १९६१पासून)
- महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा (इ.स. १९६२पासून)
- राजा परांजपे प्रॉडक्शन्सतर्फे राजा परांजपे करंडक (महाराष्ट्र) राज्यस्तरीय दीर्घांक (नाट्य) स्पर्धा
- रोटरी क्लबतर्फे विनोदी एकांकिका स्पर्धा
- विजय फौंडेशन, अकलूज आयोजित पु.ल.देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (सन २००५ पासून) राज्यातील ५ विभागांमध्ये : नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अमरावती व पुणे.
- विनोद दोशी नाट्यस्पर्धा
- शाहू मोडक स्मृती करंडक स्पर्धा, अहमदनगर
- श्रीरामपूरला महाराष्ट्र शुगर फॅक्टरीतर्फे चालणाऱ्या नाट्यस्पर्धा (आता बंद झाल्या असाव्यात).
- सोलापूरची हरिभाऊ देवकरण प्रशाला आंतरशालेय नाट्यस्पर्धा
नाट्य पुरस्कार
- संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
- झी नाट्य गौरव पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार
- पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पुरस्कार
- पु.श्री. काळे स्मृती पुरस्कार
- नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
- उत्कृष्ट एकांकिेसाठी पुरुषोत्तम करंडक
- भार्गवराम आचरेकर स्मृती पुरस्कार
- एकपात्री कलाकारांसाठी मधुकर टिल्लू स्मृती पुरस्कार
- लोकनाट्यातील कलाकारांसाठी मधू कडू स्मृती पुरस्कार
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुरस्कार
- विनोदी एकांकिकेसाठी विनोदोत्तम करंडक
- विष्णुदास भावे पुरस्कार
- सुनील तारे स्मृती पुरस्कार
रंगभूषाकार
नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --
- कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)
- नारायण देशपांडे (मृत्यू डिसेंबर २०१७)
- पंढरीनाथ जूकर
प्रकाशयोजनाकार
नाट्यसमीक्षक
- अरुण धाडीगावकर
- जयंत पवार
- दिवाकर दत्तात्रय गंधे
- वि.भा. देशपांडे
आधुनिक मराठी नाटके
१९९०च्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांना नोंद घेण्याइतपत प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता. टीव्ही मालिकांच्या सस्त्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटके देऊन प्रेक्षकांना वश करून पाहण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. या बदलांत मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतले नाटकाचे अग्रस्थान घसरत घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे असले तरी एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी नाटकांना परत ऊर्जितावस्था आली. या काळात रंगभूमीवर नवीनच किंवा नव्याने येऊन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेली नाटके अशी :
‘अबीर गुलाल’, ‘अ फेअर डील’, ‘ऑल दि बेस्ट, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘इंदिरा’, ‘कळत नकळत’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘गोष्ट तशी गमतीची’, जन्मरहस्य’, ‘ठष्ट’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘ढोलताशे’, ’दी दोघं’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’ ‘लगीनघाई’, 'वाडा चिरेबंदी’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘श्री बाई समर्थ’, ’सही रे सही’, ‘स्पिरीट’, ‘सुस्साट’, ‘सेल्फी’, ‘हा शेखर खोसला कोण आहे’, वगैरे. (अपूर्ण यादी)
आधुनिक मराठी नाटककार व त्यांचे एखादे नाटक)
अतुल पेठे, अनिल दांडेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशुतोष पोतदार, इरफान मुजावर (नंगी आवाजे), किरण यज्ञोपवीत, केदार शिंदे, चैतन्य सरदेशपांडे, तुषार भद्रे (लादेनच्या शोधात), दिलीप जगताप, धर्मकीर्ती सुमंत, डॉ. निलेश माने, प्रदीप वैद्य, प्राजक्त देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, महेश एलकुंचवार, मिहिर राजदा, युगंधर देशपांडे (दीर्घांक- अगदीच शून्य प्रयोग), राजकुमार तांगडे (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला), राजन देऊसकर, राजीव मुळे (बैल-अ-बोलबाला), विद्यासागर अध्यापक (दर्द-ए-डिस्को), संतोष गुर्जर, सौरभ पाटील, हिमांशू स्मार्त
(अपूर्ण यादी)
नाट्यगृहे
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
‘ॲड. नाना लिमये रंगमंच’ हे अलिबाग शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्त्वावर उभारलेले महाराष्ट्र राज्यातील पहिले नाट्यगृह आहे. ह्याचे उद्घाटन ७-७-२०१७ रोजी झाले.
बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :
- अण्णा भाऊ साठे रंगमंच, बिबवेवाडी, पुणे (आसनसंख्या ८५०)
- अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह, राणीचा बाग प्रांगण, भायखळा, मुंबई
- अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर (नाट्यगृह), येरवडा (पुणे). (आसनसंख्या ७००)
- अण्णा भाऊ साठे स्मारक नाट्यगृह (पद्मावती-पुणे)
- आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
- प्र.के. अत्रे नाट्यगृह, संत तुकारामनगर, पिंपरी (पुणे); (आसनसंख्या ८००)
- अनंतफंदी खुले नाट्यगृह, संगमनेर (अहमदनगर जिल्हा)
- अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
- अल्फोन्सो, मुंबई
- अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी (पिंपरी-चिंचवड) (आसनसंख्या १०००)
- अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई
- अनंतराव ठाकुर नाट्यगृह (वसई पारनाका)
- डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
- आनंदी विधान, अहमदनगर (बंद झाले)
- आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे (आसनसंख्या ४००)
- आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
- इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
- इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पूल, दत्तवाडी चौक (पुणे)
- इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
- उद्यान प्रसाद, पुणे
- एकनाथ नाट्यगृह (संत एकनाथ रंगमंदिर), औरंगाबाद. स्थापना सप्टेंबर १९८९.
- एन.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
- एन.सी. पी.ए. चे गोदरेज सभागृह
- एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
- एन.सी.पी.ए. चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
- एन.सी.पी.ए. चा जमशेदजी भाभा हॉल
- एस.एन.डी.टी. कॉलेज सभागृह, पुणे
- एस.एम. जोशी हॉल, पुणे
- औंधकर नाट्यगृह, बार्शी (बहुधा बंद पडले असावे).
- कर्नाटक संघ (झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई; (आसनसंख्या ७७४)
- कला अकॅडमी, पणजी, गोवा
- कॉकटेल थिएटर, मुंबई
- कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
- कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
- कालिदास, नाशिक
- कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
- कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
- कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
- काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
- काशीनाथ (मिनी), ठाणे
- काळे सभागृह, पुणे
- कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
- कुंदनलाल सैगल खुले नाट्यगृह, मालाड पूर्व, मुंबई
- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना
- केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
- खासबाग कुस्त्यांचे मैदान वजा खुले नाट्यगृह, कोल्हापूर
- गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
- गणेश कला केंद्र, पुणे (आसनक्षमता २५००)
- गणेश कला क्रीडा मंच
- गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
- गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
- गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
- गोकुळ तमाशा थिएटर, सांगली
- गोखले सभागृह, पुणे
- ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
- गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीचे नाट्य गृह , औरंगाबाद .
- घाटे नाट्यगृह, सातारा
- घोले रोड(पुणे)च्या आर्ट गॅलरीच्या बिल्डिंगमध्ये असलेले प्रस्तावित नाट्यगृह (आसन क्षमता २२५)
- चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
- चव्हाण नाट्यगृह, अंबरनाथ (ठाणे जिल्हा)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई (आसनसंख्या ९२८)
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
- छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या ७००)
- छाया तमाशा थिएटर, सोलापूर
- जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
- पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह, घोले रोड (पुणे).
- पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅन्टॉनमेन्ट (पुणे). (आसनसंख्या २२५)
- जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्या २५०)
- जैन संघ, कोथरूड (पुणे)
- जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
- ज्योत्स्ना भोळे रंगमंच, हिराबागेजवळ, पुणे (प्रायोगिक नाटकांसाठी छोटे नाट्यगृह)
- झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
- झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम (मुंबई), (आसनसंख्या ७७४)
- टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
- टिंबर भवन , यवतमाळ
- टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे) (आसनसंख्या ९००)
- प्र. ठाकरे, बोरीवली (पश्चिम), मुंबई
- तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
- तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
- संत तुकाराम नाट्यमंदिर (प्रचलित नाव सिडको नाट्यगृह), औरंगाबाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यगृह, औरंगाबाद
- तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक, मुंबई
- तेंडुलकर रेस्टॉरन्ट्स हॉल, मुंबई
- मास्टर दत्ताराम नाट्यगृह, फोंडा, गोवे.
- दमाणी सभागृह (सोलापूर. येथे आता नाटके हॊत नाहीत.)
- दर्शन हॉल , चिंचवड
- दादासाहेब गायकवाड, नाशिक
- दादासाहेब सरदेशपांडे (खुले?) नाट्यगृह, राजापूर (रत्नागिरी जिल्हा). हे नाट्यगृह बंद पडले आहे?
- दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
- दीनानाथ नाट्यगृहर, विलेपार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
- दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी).
- दीनानाथ सभागृह, पणजी (गोव्याच्या कला अकादमीतला एक रंगमंच)
- देवांग मेहता ऑडिटोरियम, सेनापती बापट रस्ता, पुणे
- पु.ल. देशपांडे नाट्यगृह, आकुर्डी (पुणे) (आसनक्षमता १००० - बांधकाम चालू)
- नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, कोपरगाव (अहमदनगर जिल्हा)
- नटराज नाट्यकला मंडळाचे नाट्यगृह, (बारामती) या नाट्यगृहात २९-४-२००१ रोजी हेमंत एदलाबादकर यांनी ‘तुम्ही आणि तुमचा भाग्यांक’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग सलग २८ तास ३० मिनिटे सादर केला.
- नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
- नॅशनल कॉलेजशेजारचे खुले नाट्यगृह, वांद्रे, मुंबई
- नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
- बॅ. नाथ पै रंगमंच (छोटे नाट्यगृह), पुणे (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
- ॲड. नाना लिमये रंगमंच (अलिबाग) : सहकारी तत्त्वावर उभारलेले नाट्यगृह
- निर्मलकुमार फडकुले नाट्यगृह, सोलापूर
- निळूभाऊ फुले रंगमंदिर (पिंपळे गुरव-नवी सांगवी-पुणे)
- नूतन मराठी विद्यालय, पुणे
- नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
- नेहरू सेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
- पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- पत्रकार भवन, पुणे
- परशुराम सायखेडकर, नाशिक
- पलुस्कर सभागृह, पंचवटी(नाशिक)
- पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
- पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
- पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
- पाटोळे नाट्यगृह, खामगाव
- पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
- पु.ल. देशपांडे सभागृह (पु.ल.देशपांडे कला अकादमी -रविंद्र नाट्य मंदिर),
- पिंपळे गुरव नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड (बांधकाम चालू -आसनसंख्या ५१८)
- पुरंधरे यांचे नाट्यगृह, पंढरपूर
- पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०) (शिवाय एक खुला रंगमंच)
- पै ट्रियाट्रिस्ट हॉल, मडगाव, गोवा
- बॅ. नाथ पै नाट्यमंच, पुणे (प्रायोगिक नाटकांसठी छोटे नाट्यगृह) (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
- पैसाफंड हायस्कूल रंगमंदिर, संगमेश्वर (रत्नागिरी जिल्हा)
- प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली (पश्चिम), मुंबई
- प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
- प्रबोधनकार ठाकरे खुला रंगमंच, शिवडी, मुंबई
- प्रमिलाताई ओक सभागृह(खासगी), अकोला
- प्रियदर्शिनी खुले नाट्यगृह, श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा)
- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (आसनसंख्या ७००)
- फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे
- फाइन आर्ट्स,चेंबूर, मुंबई
- महात्मा फुले नाट्यगृह, वानवडी (पुणे) (आसनसंख्या ७५० की ८१५?)
- [[सावित्रीबाई फुले[[ नाट्यगृह, डोंबिवली.
- सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (पुणे). (आसनक्षमता ४७५)
- बाकानेर, नागपूर
- बागडे नाट्यगृह, अहमदनगर
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का (पुणे)
- बालगंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव
- बालगंधर्व, नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, धुळे
- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे) (आसनसंख्या ९९०)
- बालगंधर्व, मिरज
- बालप्रसार, नागपूर
- बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
- बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, पुणे
- बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, कोथरूड, पुणे (आसनसंख्या ३८४)
- बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
- बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
- बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी (मुंबई)
- बुरीबेन गॊळवाला, घाटकोपर (मुंबई)
- बोरीवली नाट्यगृह, मुंबई
- ब्रह्मानंद, नाशिक
- भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
- भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
- भवभूती रंगमंदिर, गोंदिया
- भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
- भागवत चित्र मंदिर (सोलापूर. आता नाट्यप्रयोग होणे बंद झाले)
- भारत भवन, खुले आणि बंदिस्त नाट्यगृहे, भोपाळ
- भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
- भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
- भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
- पं. भीमसेन जोशी कलामंदिर, औंध, पुणे (आसनसंख्या ५००)
- भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड, पुणे
- मराठी साहित्य परिषद हॉल(माधवराव पटवर्धन सभागृह), पुणे
- मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
- महालक्ष्मी तमाशा थिएटर, बार्शी
- मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना
- माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
- माणिक सभागृह, वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
- मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- मीनाताई ठाकरे, भिवंडी
- मुक्त आकाश रंगमंच, मुंबई विद्यापीठ प्रांगण, कलिना, मुंबई
- मुक्तांगण हायस्कूल हॉल, शिवदर्शन चौक, पुणे
- मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
- मेघदूत खुले नाट्यगृह, दिल्ली
- कवी मोरोपंत नाट्यगृह, बारामती
- म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; हे नाट्यगृह ११८ बाय १६७ फूट या मापाचे असून त्याची उंची ३४ फूट आहे. आत एक ६७ बाय २६ फुटाची बाल्कनी आहे. नाट्यगृहात एकूण ९२८ बैठक व्यवस्था आहेत. नाट्यगृहाच्या पुढील बाजूस ५६ बाय १९ फुटाचे फॉयर असून त्याचप्रमाणे बाल्कनीतही त्या मापाचे फॉयर आहे. नाट्यगृहाचे स्टेज ६७ बाय २६ फुटाचे आहे. नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस उपहारगृह व ११५ बाय २५ फुटाचे ओपन टेरेस आहे. साऊंड, लाइट आदी सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी तेथे करण्यात आलेल्या आहेत.
- यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई
- रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई (आता हे नाट्यगृह बंदिस्त झाले\बंद झाले!)
- रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई (आसनसंख्या ८११)
- रघुवीर, नागपूर
- रमणबाग, पुणे
- रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई;(आसनसंख्या ९११)
- रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, (पु.ल.देशपांडे कला अकादमी), प्रभादेवी, मुंबई (आसनसंख्या १९९)
- रवींद्र भवन, मडगाव, गोवा
- रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
- रसिक रंजन नाट्यगृह, दापोली (रत्नागिरी जिल्हा)
- राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा
- रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे) (आसनसंख्या १२००)
- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
- रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
- लक्ष्मी नारायण बाग हॉल, शिवाजी पार्क, मुंबई १६
- लक्ष्मीप्रसाद, कोल्हापूर (बंद झाले)
- लक्ष्मीविलास, जळगाव (आता बंद पडले असावे)
- लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
- वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
- वसंतराव पवार नाट्यगृह, बारामती
- वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (आसनसंख्या ७००)
- विजय तेंडुलकर नाट्यगृह, सहकारनगर (पुणे) गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह
- विजयानंद, धुळे
- विजयानंद, नाशिक
- विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- विष्णुदास भावे, वाशी, नवी मुंबई (आसनसंख्या ८००)
- वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
- शांतादुर्गा, कणकवली
- शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर (या नाट्यगृहाचे नाव 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह' असे ठेवण्याची मागणी फेटाळली गेली)
- शाहू नाट्य मंदिर, नंदुरबार
- शाहू महाराज नाट्यगृह, हडपसर (पुणे) (निर्माणाधीन)
- शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
- शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
- शिवाजी मंदिर, दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, राजापूर (रत्नागिरी जिल्हा) (आसनसंख्या ४५०)
- छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन (सॊलापूर)
- श्रीराम, अकोले(विदर्भ)
- षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
- सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृतिभवन, शंकरनगर, अकलूज (जिल्हा सोलापूर)
- संगीत नाट्यगृह, सोलापूर
- सदासुख नाट्यगृह, सांगली (बंद झाले)
- सर्वेश, डोंबिवली
- साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
- सायखेडकर, नाशिक
- सायंटिफिक हॉल, नागपूर
- सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
- सावित्रीबाई फुले, डोंबिवली
- साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
- साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
- सिडको नाट्यगृह, (नवीन नाव : संत तुकाराम नाट्यगृह), औरंगाबाद
- सुदर्शन रंगमंच, पुणे (प्रायोगिक नाटकासाठी अहिल्यादेवी प्रशालेजवळ छोटे नाट्यगह)
- सुयोग सोसायटी, मुंबई
- सेन्ट ॲन्ड्र्यूज कॉलेज सभागृह, वांद्रे (पश्चिम), मुंबई
- सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
- स्नेहसदन, पुणे
- हनुमान तमाशा थिएटर, लालबाग (बंद झाले)
- हनुमान नाट्यगृह, म्हापसा, गोवा
- हॅपी कॉलनी हॉल, कोथरूड (पुणे)
- हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई (खुले नाट्यगृह)
- हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
- हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
- हैदरी तमाशा थिएटर, जळागाव
- होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई; (आसनसंख्या १०३०)
- ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृह, मोर्शी रोड, अमरावती
पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे
- आनंदोद्भव, पुणे
- आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
- किर्लोस्कर, पुणे
- नटराज रंगमंदिर, पुणे
- पूर्णानंद, पुणे
- बहुरूपी मंदिर, पुणे
- बाजीराव, पुणे
- भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह), पुणे
- महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
- ललकार, पुणे
- लक्ष्मीविलास, पुणे
- किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
- वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
- सरस्वती मंदिर, पुणे
मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे
- ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
- एम्पायर
- एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
- कॉरोनेशन
- केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा (पश्चिम)
- कृष्ण थिएटर
- गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
- गेइटी
- ग्रॅन्ड
- डिलाइल रोड थिएटर
- ताज थिएटर
- दौलत थिएटर, बटाट्याच्या चाळीसमोर, पिला हाउस
- नायगाव थिएटर
- नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
- न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
- न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
- पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
- प्रिन्सेस
- बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
- बॉम्बे थिएटर, पिला हाउस
- बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
- भांगवाडी थिएटर, काळबादेवी
- रंगमंदिर, दादर (या जागेवर नंतर ’शारदा’ चित्रपटगृह झाले.)
- राणीच्या बागेतले खुले थिएटर
- रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
- रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
- लोकमान्य थिएटर
- वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
- व्हिक्टोरिया थिएटर, ग्रँट रोड
- शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
- सैतान चौकीजवळचे थिएटर
विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे
- धनवटे रंग मंदिर, नागपूर
- बोके इंद्रभुवन नाट्यगृह, अमरावती
अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे
- आनंदी निधान, गांधी मैदानाजवळ, अहमदनगर
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव
- दीनानाथ नाट्यगृह, सांगली
- पुरुषोत्तम स्मृती नाट्यगृह, रत्नागिरी
- बागडे थिएटर, चितळे रोड, अहमदनगर
- मेढे यांचे शनिवार नाट्यगृह, कोल्हापूर
- लक्ष्मीप्रसाद नाट्यगह, कोल्हापूर
- शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
- सदासुख, सांगली (हे नाट्यगृह १८८७मध्ये बांधले होते)
- हंसप्रभा, सांगली (हे नाट्यगृह १८९७मध्ये बांधले होते) त्या जागी आता (नवे) बालगंधर्व नाट्यगृह आहे.
- हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
प्रसिद्ध मराठी नाटककार
- शफ़ाअत खान
- जयवंत दळवी
- दिलीप परदेशी
- पु.ल. देशपांडे
- प्रेमानंद गज्वी
- महेश एलकुंचवार
- डॉ. रंजन दारव्हेकर
- रत्नाकर मतकरी
- वसंत कानेटकर
- विजय तेंडुलकर
- वि. वा. शिरवाडकर
- श्याम मनोहर
- सतीश आळेकर
नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. प्रसिद्ध स्त्री नाटककारांची संख्या मात्र साठाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणाऱ्या काही लेखिका :
- अनसूया वाघ
- आनंदीबाई किर्लोस्कर
- इंदिराबाई पेंडसे
- इंदुमती देशमुख
- इरावती कर्णिक
- उमाबाई सहस्रबुद्धे
- कमलाबाई टिळक
- कविता नरवणे
- काशीबाई फडके
- कुसुम अभ्यंकर
- कृष्णाबाई मोटे
- गिरिजाबाई माधव केळकर
- चंद्राबाई शिंदे
- ज्योती म्हापसेकर
- ज्योत्स्ना देवधर
- ज्योत्स्ना भॊळे
- द्वारका दत्तात्रेय गुप्ते
- नलिनी सुखटणकर
- नीलकांती पाटेकर
- पद्मा गोळे
- भागीरथीबाई वैद्य
- मधुगंधा कुलकर्णी
- मनस्विनी लता रवींद्र
- मनोरमाबाई लेले
- माई वरेरकर
- माधुरी पुरंदरे
- माया पंडित
- मालती तेंडुलकर
- मालती मराठे
- मालतीबाई दांडेकर
- मालतीबाई बेडेकर
- मुक्ताबाई दीक्षित
- योगिनी जोगळेकर
- रचेल गडकर
- लीला चिटणीस
- वनिता देसाई
- वसुंधरा पटवर्धन
- वसुधा पाटील
- विभावरी देशपांडे
- विमल काळे
- विमल घैसास
- शकुंतला परांजपे
- शिरीष पै
- सई परांजपे
- सरिता पदकी
- सुधा साठे
- सुधा करमरकर
- सुमतीबाई धनवटे
- सुषमा देशपांडे
- हिराबाई पेडणेकर
- क्षमाबाई राव
यांशिवाय काही नवोदित लेखिकाही आहेत.
प्रसिद्ध नाटके
स्वतंत्र पानावर पहावे.
- नोबेल पुरस्कारप्राप्त लुइजी पिरांदेल्ली (१८६७ ते १९३६) या इटालियन नाटककाराच्या ’सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ ऑथर’ या नाटकाचे माधव वाटवे यांनी केलेले ’नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ हे मराठी रूपांतर. २५ ऑगस्ट १९६७ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत सादर केला. ’टीपॉट’ नावाच्या एका नाटक कंपनीनेही हे नाटक २०१४साली रंगमंचावर सादर केले आहे.
हे सुद्धा पहा
आक्षेप घेतलेली नाटके
सरकारने, विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्न केलेली काही नाटके :
- ’आग्ऱ्याहून सुटका’ आणि ’बेबंदशाही’ या नाटकांत शिवाजीला टाळ्या मिळत असल्याने नाटकांवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून नाटकाचे लेखक औंधकर यांनी शिवाजीपेक्षा औरंगजेबाचे महत्त्व वाढवून प्रयोग पुढे चालू ठेवले.
- एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
- संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली. (नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे)
- कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती म्हणून वाद झाले होते.
- गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
- गांधी विरुद्ध गांधी (लेखक अजित दळवी). गांधीच्या नावाचा तथाकथित दुरूपयोग. आक्षेप टिकला नाही.
- घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
- पती माझे छत्रपती (संजय पवार). छत्रपती या शब्दाने शिवाजीची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर, ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
- जय भीम, जय भारत या नाटकातल्या ’खैरलांजी’, कुत्रे’, ’रमाबाईनगर’ आदी शब्दांना परिनिरीक्षण मंडळाने हरकत घेतली आहे; या शब्दांऐवजी अनुक्रमे वैरांजली, श्वान, मीराबाईनगर असे शब्द वापरावेत अशी त्यांची सूचना आहे.
- बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
- संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
- मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी). नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप. नाटकात शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका आहे. या नाटकाचे १०००हून अधिक प्रयोग झाले आहेत.
- यदाकदाचित (संजय पवार). नाटकात देवदेवतांचे विकृत चित्रण आहे हा आक्षेप होता. कुठल्या तरी गावात हिंदू जागरण मंचाने हे नाटक बंद पाडले होते.
- योनीमनीच्या गुजगोष्टी (बोरीवलीच्या नाट्यगृहाची बंदी) (ठाणे महापालिकेचीही बंदी). (कारण उघड आहे.)
- संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
- वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर). महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून.
- विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
- शँपेन आणि मारुती (लेखक विवेक बेळे) या नाटकाचे नाव बदलून ’माकडाच्या हाती शँपेन’ असे करावे लागले. (१९ व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेले सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले नाटक).
- शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (लेखक संभाजी (की राजकुमार?) तांगडे-भीमनगर शब्दाबद्दल नांदेड पोलिसांचा आक्षेप)- नाटकाचे परीक्षण {http://artnviews.com} वर वाचा. नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
- स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
- हे राम नथुराम : (लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे). या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. (१९-१२-२०१६). संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत हे राम नथुराम या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली (२१-१-२०१७). तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.
परिनिरीक्षण मंडळ
कोणत्याही नाटकाचा प्रयोग करावयाचा असेल तर त्या नाटकाच्या संहितेच्या दोन प्रती. महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाला सादर कराव्या लागतात. या सेन्सॉर बोर्डाचे दोन प्रतिनिधी ही संहिता वाचून त्याविषयीचा अभिप्राय बनवतात. मंडळाच्या अध्यक्षांची सही झाल्यावर एक प्रमाणपत्र आणि डीआरएम क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र किंवा हा क्रमांक नसेल तर नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर करता येत नाही.
मात्र, महाराष्ट्र नाट्य-परिनिरीक्षण मंडळाची स्थापना १९९०मध्ये झाली असल्याने,. जर नाटक इ.स. १९९० पूर्वीचे असेल तर त्याचे परिनिरीक्षण करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. ते नाटक डीआरएम क्रमांकाशिवाय सादर करता येते.
मराठीतली काही बोल्ड नाटके
- ॲग्रेसिव्ह (लेखक निनाद शरद शेट्ये)
- अवध्य (लेखक चि.त्र्यं. खानोलकर)
- एक चावट मधुचंद्र (लेखक रमेश वारंग)
- एक चावट संध्याकाळ (लेखक अशोक पाटोळे)
- गुपीत योनींच्या गुप्त गोष्टी (लेखिका सोनिया चौधरी, दिग्दर्शक विक्रम पाटील)
- गेली एकवीस वर्षे (धर्मकीर्ती सुमंत)
- चावट शेजारी (लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी)
- त्या चार योनींची गोष्ट (मूळ कथा-Vagina, the Shadow of a Lady; मराठीलेखन दिग्दर्शन नितिशकुमार)
- दोन बायका चावट ऐका (लेखक सुदेश म्हशीलकर, संतोष कोचरेकर)
- नशिल्या मुलीची मदमस्त कहाणी (लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी)
- मात्र रात्र (मूळ इंग्रजी Bradley Hayward's romantic comedy, LEGITIMATE HOOEY; मराठी अनुवाद सागर देशमुख)
- म्युझिक सिस्टिम (दिग्दर्शक विजय केंकरे)
- नाटक नको (लेखक धर्मकीर्ती सुमंत)
- योनीमनीच्या गुजगोष्टी (मूळ इंग्रजी नाटक Vagina Monologues, लेखिका ईव्ह एन्स्लर, मराठी रूपांतर वंदना खरे)
- सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर)
पाचशेहून अधिक प्रयोग झालेली नाटके
नाटकाचे नाव | लेखक | शेवटच्या ज्ञात प्रयोगाची क्रमसंख्या | त्या प्रयोगाची तारीख |
---|---|---|---|
अवघा रंग एकचि झाला | डॉ.मीना नेरूरकर | >३०० | २०१३ |
अश्या बायका तश्या बायका | मधुसूदन घाणेकर | ५०० | मार्च २०१३ |
आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका भक्ती बर्वे) | अशोक पाटोळे | ७५० | ॑॑॑॑॑ |
आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका स्मिता जयकर) | अशोक पाटोळे | ११२ | १३-९-२०१४ |
इथे ओशाळला मृत्यू | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
एका लग्नाची गोष्ट | श्रीरंग गोडबोले | १५०६ | ३०-१-२००५ |
संगीत एकच प्याला | राम गणेश गडकरी | ****** | ॑॑॑॑॑ |
कचऱ्या हिंदुस्थानी (एकपात्री) | रमेश थोरात | ७६९ | १२-१०-२०११ |
कट्यार काळजात घुसली | पुरुषोत्तम दारव्हेकर | ****** | ॑॑॑॑॑ |
कथा अकलेच्या कांद्याची | शंकर पाटील | ****** | ॑॑॑॑॑ |
करायला गेलो एक | बाबूराव गोखले | ****** | ॑॑॑॑॑ |
कुलवधू | मो.ग. रांगणेकर | >२००० | ॑॑॑॑॑ |
कुटुंब रंगलंय काव्यात (एकपात्री नाट्यानुभव) | विश्वनाथ श्रीधर तथा विसुभाऊ बापट | २२५० | १७-७-२०११ |
कुर्यात् सदा टिंगलम् | शिवराज गोर्ले | >१२०० | ऑक्टोबर २०११ |
खळखळाट (एकपात्री) | बंडा जोशी | १०० | २२ एप्रिल २०१४ |
गारंबीचा बापू | श्री.ना. पेंडसे | ****** | ॑॑॑॑॑ |
गुंतता हृदय हे | शं.ना. नवरे | ****** | ॑॑॑॑॑ |
गेला माधव कुणीकडे | वसंत सबनीस | १७५० | २३-३-२०१३ |
गोकुळचा चोर | नानासाहेब शिरगोपीकर | ****** | ॑॑॑॑॑ |
गोलमाल | शिवराज गोर्ले | १०० | २-३-२०१३ |
घाशीराम कोतवाल | विजय तेंडुलकर | १८५० | १८-१-२०१२ |
घोटभर पाणी (एकांकिका) | प्रेमानंद गज्वी | ३००१ | २६-५-२०१२ |
चार दिवस प्रेमाचे | रत्नाकर मतकरी | १०२६ | ? |
जाणता राजा | बाबासाहेब पुरंदरे | १२५१ | २७-२-२०१३ |
जांभूळ आख्यान | विठ्ठल उमप | >७०० | २६-११-२०१२ |
ज्याचा त्याचा प्रश्न | अभिराम भडकमकर | >४५० | ? |
झोपी गेलेला जागा झाला | बबन प्रभू | ****** | ॑॑॑॑॑ |
टुरटूर | पुरुषोत्तम बेर्डे | ५४३ | ? |
तरुण तुर्क म्हातारे अर्क | मधुकर तोरडमल | ****** | ॑॑॑॑॑ |
तुझे आहे तुजपाशी | पु.ल.देशपांडे | ****** | ॑॑॑॑॑ |
तो मी नव्हेच | आचार्य प्र.के.अत्रे | >३००० | १४-३-२०१२ |
दिनूच्या सासूबाई राधाबाई | बबन प्रभू | ****** | ॑॑॑॑॑ |
दिलखुलास (एकपात्री) | स्वाती सुरंगळीकर | २५० | २५-५-२०१३ |
दुरितांचे तिमिर जावो | बाळ कोल्हटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
नटसम्राट | वि.वा.शिरवाडकर | ११५ | १९-८-२०१५ |
पंडितराज जगन्नाथ | विद्याधर गोखले | ****** | ॑॑॑॑॑ |
प्रेमा तुझा रंग कसा? | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
ब्रम्हचारी | आचार्य अत्रे | ५०३ | १९८६ |
संगीत भावबंधन | राम गणेश गडकरी | ****** | ॑॑॑॑॑ |
मराठी पाऊल पडते पुढे (मराठमोळ्या गीत-नृत्यांचा कार्यक्रम) | उदय साटम (दिग्दर्शक) | २७०० | ९-१०-२०१२ |
संगीत मानापमान | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | ****** | ॑॑॑॑॑ |
मिस्टर ॲन्ड मिसेस | अस्लम परवेझ व निलेश रूपापारा | १११ | २४-८-२०१४ |
मी जोतीराव फुले बोलतोय | ... ? ... | ६८० (?) | २७-६-२०१२ |
मी नथूराम गोडसे बोलतोय | प्रदीप दळवी | ८१७ | जानेवारी २०१६ |
मोरूची मावशी | आचार्य प्र.के.अत्रे | १३३० | १९८५ |
यदा कदाचित | संतोष पवार | ३६०० | इ.स. २००० |
रमाई | प्रभाकर दुपारे | ५०१ | २१-४-२०११ |
रायगडाला जेव्हां जाग येते | वसंत कानेटकर | २५२० | २९-३-२०१५ |
लग्नाची बेडी | आचार्य प्र.के.अत्रे | >५००० | ॑॑॑॑॑ |
लावणी भुलली अभंगाला | जगदीश दळवी | >२००० | ॑॑॑॑॑ |
लोच्या झाला रे | केदार शिंदे | >१००० | या नाटकावरून चित्रपट बनला. |
वर्हाड निघालंय लंडनला | लक्ष्मण देशपांडे | >>२००० | ॑॑॑॑॑ |
वस्त्रहरण | गंगाराम गव्हाणकर | ५००० | २१-११-२००९ |
वाटेवरती काचा गं (बाहुली नाट्य) | डाॅ.अनिल बांदिवडेकर | >५०० | ॑॑॑॑॑ |
वाहतो दुर्वांची ही जुडी | बाळ कोल्हटकर | >१००० | ..?.. |
विच्छा माझी पुरी करा | वसंत सबनीस | ****** | ॑॑॑॑॑ |
व्यक्ती आणि वल्ली | पु.ल. देशपांडे | >४५२ | २०१३ |
शंभूराजे | सुरेश चिखले | ३३३ | २१-३-२०१३ |
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला | राजकुमार तांगडे | २२४ | २७-७-२०१३ |
श्रीमंत दामोदरपंत | केदार शिंदे | ३५० | ३५० प्रयोगानंतर नाटकाची सीडी बनली आणि नंतर सिनेमा |
संगीत शाकुंतल | अण्णासाहेब किर्लोस्कर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत शारदा | गोविंद बल्लाळ देवल | ****** | ॑॑॑॑॑ |
सबकुछ मधुसूदन (इ.स. १९६३पासून सुरू असलेला एकपात्री मनोरंजक कार्यक्रम) | डॉ.मधुसूदन घाणेकर|२०००० | मार्च २०१३ | |
संगीत संशयकल्लोळ | गोविंद बल्लाळ देवल | ****** | ॑॑॑॑॑ |
सही रे सही | केदार शिंदे | >१००० | ॑॑॑॑॑ |
सासूबाईंचं असंच असतं | आचार्य प्र.के.अत्रे | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत सौभद्र | अण्णासाहेब किर्लोस्कर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत स्वयंवर | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | ****** | ॑॑॑॑॑ |
नाटक या विषयावरील मराठी पुस्तके
- अॅबसर्ड थिएटर (माणिक कानेड)
- अस्ताई (केशवराव भोळे)
- आताची नाटके (राजीव नाईक)
- Indian English Drama (इंग्रजी, ॲटलांटिक पब्लिशर्स)
- एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप (डॉ. मधुरा कोरान्ने)
- एका खेळियाने (दिलीप प्रभावळकर) : किमान पाच आवृत्या; प्रभावळकरांच्या भूमिकांवरील लेखसंग्रह.
- कथा दोन सोंगाड्यांची (सोपान हरिभाऊ खुडे) : गायक दत्ता महाडिक आणि तमासगीर गुलाबराव बोरगावकर यांचे चरित्र)
- कथारूप शेक्सपिअर (अनेक खंड, प्रभाकर देशपांडे साखरेकर)
- कलावंतांच्या सहवासात (वसंत शांताराम देसाई)
- कलेचे कटाक्ष (वसंत शांताराम देसाई)
- कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची (श्रीराम रानडे)
- किर्लोस्कर आणि देवल (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई))
- कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी (वसंत शांताराम देसाई)
- खाडिलकरांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
- खानोलकरांची नाट्यसृष्टी (डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस)
- खानोलकरांचे नाटक (डॉ. माधवी वैद्य)
- गडकऱ्यांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
- चौकट दिग्दर्शनाची (कुमार सोहोनी)
- दलित रंगभूमी आणि नाटक (बबन भाग्यवंत)
- दलित रंगभूमी आणि नाट्यचळवळ (डॉ. मधुकर मोकाशी)
- दळवींची नाटके : एक अंतर्वेध (डॉ. स्वाती कर्वे)
- दहाव्या रांगेतून (वसुंधरा काळे)
- नट, नाटक आणि नाटककार (वसंत शांताराम देसाई)
- नाटकवाल्याचे प्रयोग (अतुल पेठे)
- नाट्यकोश (वि.भा. देशपांडे)
- नाट्यलेखन (एक क्ष-किरण): लेखक - श्रीनिवास भणगे
- नाट्याक्षरे (मधुरा कोरान्ने),
- पडद्यामागील किस्से (अरुण धाडीगावकर) :रंगमंचाच्या मागे घडलेले कलावंतांचे आणि नाटककारांचे काही भन्नाट किस्से.
- बातचीत महेश एलकुंचवारांशी (आशिष राजाध्यक्ष, समीक बंडोपाध्याय, संजय आर्वीकर)
- बालगंधर्व : व्यक्ती आणि कला (वसंत शांताराम देसाई)
- ‘बेगम बर्वे' विषयी (रेखा इनामदार साने)
- बोलता...बोलता... (नाट्यविषयक मुलाखती, मधुरा कोरान्ने)
- भरतमुनींचे नाट्यशास्त्र (सरोज देशपांडे)
- भारतीय नाट्यप्रयोगविज्ञान (प्रा. अ.म. जोशी)
- भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार (अमला शेखर, सरोज देशपांडे, शुभांगी बहुलीकर)
- भारतीय रंगभूमीची परंपरा (डॉ. माया सरदेसाई)
- मखमलीचा पडदा (वसंत शांताराम देसाई)
- मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा (मधुरा कोरान्ने)
- मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल (श्रीपाद लाटकर)
- महानगरी नाटके (२००० ते २०१०) - नाट्यपरीक्षणे, लेखक - कमलाकर नाडकर्णी
- महाराष्ट्राची लोकनृत्य नाट्यधारा (हिरामण लांजे रमानंद)
- रंगदर्शन (हिंदी नाट्यसमीक्षा, नेमिचन्द्र जैन)
- रंगदर्शन (मौज प्रकाशन) या पुस्तकात काकासाहेब खाडिलकर ते जयंत पवार यांच्यापर्यंतच्या सात नाटकांच्या समीक्षासहित समाजातल्या प्रतिक्रियांची नोंद घेतली आहे.
- रागरंग (वसंत शांताराम देसाई)
- रिंगणनाट्य (सहलेखक राजू इनामदार)
- ललितकलेच्या सहवासा- त (‘ललितकलादर्श नाटक मंडळी’मधील आठवणी, पु.श्री. काळे)
- विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
- विस्मरणात गेलेली नाटके (डॉ. अरविंद वामन कुलकर्णी) (शोधमूलक, विश्लेषणात्मक आणि चिकित्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या ‘तृतीय नेत्र’ (१८५५) नाटकापासून पु. भा. डोंगरे यांच्या ‘संगीत चंद्रहास’(१९०३) नाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. पद्मगंधा प्रकाशन)
- सहा शोकनाट्ये : कमला, राजा इडिपस, एकच प्याला, वेड्याचं घर उन्हात, संध्याछाया, सवाई माधवरावाचा मृत्यू ह्या नाटकांच्या पार्श्वभूमीवर एकूण शोकांतिकांचेच विश्लेषण (शशिकांत लोखंडे)
- स्त्री नाटककारांची नाटके (स्नेहवर्धन प्रकाशन, मधुरा कोरान्ने)
- स्त्री समस्या आणि आजचे नाटक (स्नेहवर्धन प्रकाशन, मधुरा कोरान्ने)
- ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म-दर्शने (प्रा. मधु पाटील)
संदर्भ
- [१] My Theatre -सुनील चांदूरकर यांचे संकेतस्थळ)
- [२] (Pune Theatre -पुणे थिएटर गाईड)
- [३] (Art n views -प्रदीप वैद्य यांचे संकेतस्थळ)
पहा : महाराष्ट्रातील नाट्य संस्था, नाट्यस्पर्धा, एकपात्री नाटक