विष्णुदास भावे पुरस्कार
विष्णूदास भावे पुरस्कार विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने प्रदान केलेला पुरस्कार आहे. इ.स. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला.
स्वरूप
[संपादन]गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मानकरी
[संपादन]हा पुरस्कार अमोल पालेकर (२०१२), केशवराव दाते, ग.दि.माडगूळकर, छोटा गंधर्व, जयंत सावरकर (२०१६), डॉ. जब्बार पटेल (२०१४), ज्योस्ना भोळे, दिलीप प्रभावळकर (२००७), दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री. काळे, बापूराव माने, बालगंधर्व (१९५९), फैय्याज (२०१०), भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार (२०१३), माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, मोहन जोशी (२०१७), रत्नाकर मतकरी (२०११), रामदास कामत (२००८), वसंत कानेटकर, विक्रम गोखले (२०१५), विश्राम बेडेकर, शं.ना. नवरे (२००९), शरद तळवलकर, हिराबाई बडोदेकर, आदींना मिळाला आहे.[१]