भगतसिंग कोश्यारी
भगतसिंग कोश्यारी | |
कार्यकाळ ५ सप्टेंबर २०१९ – फेब्रुवारी २०२३ | |
मुख्यमंत्री | उद्धव ठाकरे |
---|---|
मागील | सी. विद्यासागर राव |
पुढील | रमेश बैस |
गोव्याचे राज्यपाल
(अतिरिक्त जबाबदारी) | |
कार्यकाळ १८ ऑगस्ट २०२० – ६ जुलै २०२१ | |
मागील | सत्यपाल मलिक |
पुढील | पी. एस. श्रीधरन पिल्लई |
दुसरे उत्तराखंडचे मुख्यमंत्री
| |
कार्यकाळ ३० ऑक्टोबर २००१ – १ मार्च २००२ | |
राज्यपाल | सुरजित सिंग बर्नाला |
मागील | नित्यानंद स्वामी |
पुढील | एन डी तिवारी |
कार्यकाळ २६ नोव्हेंबर २००८ – १६ मे २०१४ | |
मागील | हरिश रावत |
पुढील | मनोरमा डोबरियाल शर्मा |
मतदारसंघ | उत्तराखंड |
कार्यकाळ १६ मे २०१४ – १३ मे २०१९ | |
मागील | अजय भट्ट |
पुढील | के.सी.सिंग बाबा |
मतदारसंघ | नैनिताल-उधमसिंग नगर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
शिक्षण | कला शाखेतून स्नातकोत्तर पदवी (एम.ए) |
गुरुकुल | आग्रा विद्यापीठ |
व्यवसाय | शिक्षक, लेखक, पत्रकार, राजकारणी |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | rajbhavan-maharashtra |
भगतसिंग कोश्यारी ( १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी ऊर्जा, पाटबंधारे, जलसिंचन, न्याय व विधिमंडळ कामकाज मंत्री झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते नैनीताल-उधमसिंहनगर(काशीपूर )लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[१] भगतसिंग कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत कोश्यारींना तुरुंगवास भोगावा लागला. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली.[२]
अध्यन व अध्यापन
[संपादन]भगतसिंग कोश्यारी हे अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले होते. ते इंग्रजी विषयाचे एमए आहेत. शिक्षण संपल्यावर त्यानंतर उत्तरप्रदेश राज्यातील एटा येथे काही काळ अध्यापनाचे काम केले.
समाजसेवा
[संपादन]कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात संघातूनच झाली. समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळांची व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.[३]
पत्रकारिता व लेखन
[संपादन]१९७५ पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते (आता?). विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि ‘ उत्तरांचल : संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत.[२]
राजकीय पदे
[संपादन]उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमांतून कोश्यारींनी मोलाची भूमिका बजावली. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते.
[३] फेब्रुवारी २००९ ते मे २००९ या कालावधीत कोश्यारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट २००९ पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.[२][२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c d "कोण आहेत भगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी". 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ a b "कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]