आचार्य देवव्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आचार्य देवव्रत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुख्यमंत्री विजय रुपाणी
भूपेंद्रभाई पटेल
मागील ओम प्रकाश कोहली

मागील कल्याण सिंग
पुढील कलराज मिश्रा

जन्म १८ जानेवारी, १९५९ (1959-01-18) (वय: ६५)
समलखा, पंजाब, भारत (सध्याचे हरियाणा)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी दर्शना देवी[१]
धर्म हिंदू

आचार्य देवव्रत (जन्म:१८ जानेवारी १९५९) हे एक भारतीय शिक्षणतज्ञ आहेत जे जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. ते आर्य समाजाचे प्रचारक आहेत आणि त्यांनी यापूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे.[२][३][४][५]

गुजरातचे राज्यपाल असल्याने ते गुजरातच्या राज्य विद्यापीठांचे कुलपतीही आहेत. जून 2019 मध्ये, ओम प्रकाश कोहलीच्या जागी गुजरातचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.[६]

आचार्य देवव्रत हे आर्य समाजी असून ते नैसर्गिक शेती देखील करतात. नर्मदा, गुजरात येथील एका नैसर्गिक शेती शिबिरात त्यांनी म्हटले की,

देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक मंदिरात जातात, मशिदीत जातात, गुरुद्वाऱ्यात जातात, चर्च मध्ये जातात. पण मला सांगायचे आहे की तुम्ही लोक नैसर्गिक शेती करायला लागाल तर देव आपोआप प्रसन्न होईल.

सध्या जी रासायनिक शेती केली जात आहे, त्याद्वारे तुम्ही प्राणी मारण्याचे काम करत आहात, नैसर्गिक शेती केल्यास जीवदानाचे काम होईल. मनुष्य हा एक असा प्राणी आहे, त्याच्यासारखा ढोंगी, कृत्रिम आणि दांभिक दुसरा कोणी नाही.

तुम्ही 'गौ माता की जय' म्हणता, तिची पूजा करता, तिलक लावता, तुम्ही घंटा वाजवता, पण गाय जर दूध देत नसेल तर तिला घराबाहेर हाकलून देता. गौ माते तुला नमस्कार असो. म्हणूनच मी म्हणतो हिंदू समाज हा ढोंगी नंबर वन आहे.

[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Himachal Governor, wife opt for postal ballot". Business Standard India. IANS. 7 May 2019. 23 July 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "R N Kovind appointed governor of Bihar, Acharya Dev Vrat named Himachal governor". The Times of India. 8 August 2015. 8 August 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Himachal Pradesh Guv-designate Acharya Dev Vrat hails BJP for choosing 'non-political' person". DNA. 8 August 2015. 8 August 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Ram Nath Kovind, Acharya Dev Vrat appointed Bihar,Himachal Governors". Business Standard. 8 August 2015. 8 August 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Ramdev follower Acharya Dev Vrat is HP Governor". The Tribune. 9 August 2015. Archived from the original on 2015-08-09. 9 August 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Kalraj Mishra Appointed Himachal Pradesh Governor, Acharya Devvrat Shifted to Gujarat". News18. 16 July 2019. 11 January 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "'हिंदू समाज ढोंगी नंबर वन है' गाय पर बोलते हुए भड़क उठे गुजरात के राज्यपाल". आज तक. १ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.