Jump to content

आनंदीबेन पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आनंदीबेन पटेल

विद्यमान
पदग्रहण
२९ जुलै २०१९
मागील राम नाईक

कार्यकाळ
२२ मे २०१४ – ७ ऑगस्ट २०१६
मागील नरेंद्र मोदी
पुढील विजय रूपाणी
मतदारसंघ घाटलोदिया

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर, इ.स. २००० – फेब्रुवारी २, इ.स. २००५
मागील १९९४
पुढील १९९८

जन्म २१ नोव्हेंबर, १९४१ (1941-11-21) (वय: ८२)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू

आनंदीबेन पटेल (गुजराती: આનંદીબેન પટેલ, २१ नोव्हेंबर १९४१) ह्या भारतीय जनता पक्षाच्या गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी व गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तसेच गुजरात विधानसभेवर सलग चार वेळा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आहेत. त्या नरेंद्र मोदींच्या राज्य सरकारमध्ये अनेक वर्षे शिक्षणमंत्री होत्या. मोदी यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून महिला साक्षरतेसह अनेक महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत.

१९८७मध्ये सरदार सरोवरात बुडत असलेल्या दोन मुलींना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वाचवण्याचे धाडस आनंदीबेन यांनी दाखवले होते. अनेक पारितोषिके मिळविलेल्या आदर्श शिक्षिका, शिस्तबद्ध प्रशासक, धाडसी महिला, धडाडीच्या मंत्री अशी ख्याती आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसाठी त्यांनी घालून दिलेली व्यवस्था राज्यात कौतुकास्पद ठरली. अन्यथा बदल्या आणि बढत्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच होते. मात्र, स्वतः शिक्षिका म्हणून काम केलेल्या आनंदीबेन यांनी प्रशासनाला चांगला धडा घालून दिला. त्या स्वतः काटकसरी आहेत. राज्यभर अविश्रांत प्रवास करून त्या सरकारी योजनांची, प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करतात. नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते, तेव्हा गुजरातची धुरा आनंदीबेन याच सांभाळत होत्या, त्यामुळे त्याच मोदींची जागा घेतील, अशी अटकळ बांधली जात होती.

आनंदीबेन यांची १९९२मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. १९९८मध्ये त्या विधानसभेची निवडणूक जिंकून केशुभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्या.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले. त्यांच्या जागेवर गुजरातमधील सर्वात वरिष्ठ नेत्या म्हणून आनंदीबेन पटेलांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली. २ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर राज्यातील काही महत्त्वाच्या घटना हाताळण्यात अपयश आल्याच्या कारणावरून पटेल ह्यांनी २०१६ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांच्या जागी विजय रूपाणी ह्यांची निवड केली व ७ ऑगस्ट २०१६ रोजी रूपाणींनी पदाची शपथ घेतली.

बाह्य दुवे

[संपादन]