ला. गणेशन
| ला. गणेशन | |
१७ वे मणिपूरचे राज्यपाल | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २७ ऑगस्ट २०२१ | |
| राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
|---|---|
| मुख्यमंत्री | एन. बीरेन सिंह |
| मागील | गंगा प्रसाद (अतिरिक्त कार्यभार) |
| कार्यकाळ ६ ऑक्टोबर २०१६ – २ एप्रिल २०१८ | |
| मागील | नजमा हेपतुल्ला |
| पुढील | कैलास सोनी |
| कार्यकाळ 18 July 2022 – 17 November 2022 | |
| जन्म | १६ फेब्रुवारी, १९४५ तंजावर, तमिळनाडू |
| मृत्यू | १५ ऑगस्ट, २०२५ (वय ८०) चेन्नई |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
ला. गणेशन अय्यर (१६ फेब्रुवारी, १९४५ - १५ ऑगस्ट, २०२५) हे भारतीय राजकारणी आणि २७ ऑगस्ट २०२१ पासून मणिपूरचे राज्यपाल होते. राज्यपाल होण्यापूर्वी ते तमिळनाडू भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.[१]
प्रारंभिक जीवन
[संपादन]त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९४५ रोजी तामिळ ब्राह्मण कुटुंबातील इलाकुमिराकवन आणि अलामेलू यांचा मुलगा म्हणून झाला. लहान वयातच वडील गमावल्यानंतर भावाच्या जिव्हाळ्यात ते वाढले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला आणि लग्न न करता नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात जगण्यास सुरुवात केली.
मृत्यू
[संपादन]मधुमेहामुळे त्यांच्या पायाला जखम झाली होती. यावर उपचार करण्यात आले होते. नंतर, घरी विश्रांती घेत असताना, ५ ऑगस्ट २०२५ रोजी, त्यांचा पाय सुन्न झाल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत कोसळले.
८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना चक्कर येणे आणि मळमळ होणे असे त्रास सुरू झाले. त्यांना चेन्नईतील थाउजंड लाइट्स येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांच्या डोक्यात रक्ताची गुठळी असल्याचे दिसून आली. गुठळीच्या शस्त्रक्रियेनंतर, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. परंतु १५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. राज्यपाल पदावर असताना मृत्यू पावलेले ते नागालँडचे पहिले राज्यपाल होते.
राजकीय कारकीर्द
[संपादन]ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्या जागी मध्य प्रदेशातून राज्यसभेत खासदार म्हणून निवड करण्यात आली होती.[२]
२२ ऑगस्ट २०२१ रोजी, त्यांची भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी मणिपूरचे १७ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
संदर्भ
[संपादन]- ↑ https://www.thequint.com/news/hot-news/bjp-leader-la-ganesan-appointed-as-new-governor-of-manipur
- ↑ Oct 6, TNN /; 2016; Ist, 20:17. "Rajya Sabha: BJP's iLa Ganesan elected unopposed to Rajya Sabha from Madhya Pradesh | Bhopal News - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)