विजयालक्ष्मी पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विजयालक्ष्मी पंडित
Vijaya Lakshmi Pandit.jpg
जन्म विजयालक्ष्मी
१८ ऑगस्ट १९००
मृत्यू १ डिसेंबर १९९०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा राजकारणी
पदवी हुद्दा राज्यपाल
कार्यकाळ १९६२-१९६४
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदु
जोडीदार रणजीत सिताराम पंडित
अपत्ये नयनतारा सहगल
वडील मोतीलाल नेहरू
आई स्वरूप राणी
नातेवाईक जवाहरलाल नेहरू

विजयालक्ष्मी पंडित या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या व जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या.

बालपण[संपादन]

१८ ऑगस्ट १९०० साली स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहिण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू असे होते. स्वरूप यांचा स्वभाव आज्ञाधारक व अतिशय सौम्य असा होता. त्या स्वाभिमानी आणि उत्साही होत्या.

शिक्षण[संपादन]

पहिली पाच वर्षे स्वरूप यांच्या वडिलांनी घरीच एक इंग्रज शासिका नेमलल्या होत्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. स्वरूप पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या, त्यांचे नाव ‘कु’ असे होते. स्वरूप यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेल्या.

विवाह[संपादन]

स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट रणजीत पंडित यांच्याशी झाली.ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजीत यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांचे नाव स्वरूपचे ‘विजयालक्ष्मी पंडित’असे झाले.

कार्य[संपादन]

विजयालक्ष्मी पंडित या संसदपट्टू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. इ.स. १९६४ मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या.

मृत्यू[संपादन]

त्यांचा मृत्यू १ डिसेंबर १९९० मध्ये झाला.

संदर्भ[संपादन]

  • महान स्त्रिया: लेखिका - अनुराधा पोतदार ,परी प्रकाशन कोल्हापूर.आवृत्ती-२०१३