पालर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पालर नदी (तमिळ: பாலாறு; कन्नड: ಪಾಲಾರ್ ನದಿ; तेलुगू: పాలార్ నది) ही दक्षिण भारतातील एक नदी आहे. ही नदी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात असलेल्या नंदी टेकड्यांमध्ये उगम पावते व कर्नाटक (९३ किमी), आंध्र प्रदेश (३३ किमी) आणि तमिळनाडू (२२२ किमी) राज्यांतून वाहत चेन्नईच्या दक्षिणेस १०० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरास मिळते.