Jump to content

ताड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताड या वनस्पतीचे शास्त्रीय नाव बोरैैसस फ्लेेबेलीफर (Borassus flabellifer) असे आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीला दिर्धतरु, तृणराज, लेख्यपत्र व ताल अशी संस्कृत नावे आहेत. याचे झाड उंच असते. ते सरळ वाढते व फक्त याच्या माथ्यासच पाने असतात. यास त्याखाली फांद्या असत नाहीत. याचे खोडास खाचा असतात.

  • याचेपासुन ताडी हे पेय बनवितात. सुर्योदयापूर्वी प्यायल्यास हे स्फुर्तीदायक असते.

दक्षिण भारत, गोवा व समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात ही झाडे बहुसंख्य आढळतात. यास पिवळ्या रंगाची फळे येतात. याच्या ईतरही अनेक प्रजाती आहेत.

नारळाचे झाड ही त्यापैकी एक.

तमिळनाडू राज्याचा राज्यवृक्ष.