पळणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पळणी
पझानी
छोटे शहर
वरच्या कोपऱ्यातून डावीकडे घड्याळाच्या दिशेने: पळनी मुरुगन मंदिर, विंचने ओढणारी गाडी, वैपुरी तलाव, डोंगराच्या वरचे मंदिर
वरच्या कोपऱ्यातून डावीकडे घड्याळाच्या दिशेने: पळनी मुरुगन मंदिर, विंचने ओढणारी गाडी, वैपुरी तलाव, डोंगराच्या वरचे मंदिर
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
क्षेत्र कोंगुनाडू [२]
जिल्हा दिंडुक्कल
शासन
 • प्रकार नगरपालिका
लोकसंख्या (2011)[३]
 • एकूण ७०,४६७
 • घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
वेळ क्षेत्र IST (यूटीसी+5:30)
PIN ६२४ ६०१
टेलिफोन कोड ०४५४५
वाहन नोंदणी क्रमांक TN ९४ (Before TN ५७)
Website palanimurugantemple.org

पळणी किंवा पझानी (तमिळ: பழனி) भारताच्या तमिळनाडू राज्यातील दिंडुक्कल ह्या जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर कोइंबतूरच्या दक्षिण-पूर्वेस १०० किलोमीटर (६२ मैल), मदुराईच्या उत्तर-पश्चिमेला १०० किलोमीटर (६२ मैल), आणि कोडैकानलपासून ६७ किलोमीटर (४२ मैल) अंतरावर आहे. भगवान मुरुगन यांना समर्पित पालानी मुरुगन मंदिर किंवा अरुलमीगु कुलाझांडैवेल्लयुथ स्वामी मंदिर (तिरुआविननकुडी) हे शहर टेकडीवर वसलेले आहे. या देवाचा या शहरावर वरदहस्त आहे. दरवर्षी या मंदिरात ७० लाखांहून अधिक भाविक येतात. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ७०,४६७ होती.

व्युत्पत्ती[संपादन]

या शहराचे नाव पझानी हे दोन तामिळ शब्दांपासून बनले आहे, पझम म्हणजे फळ आणि नी म्हणजे तु. याचा उल्लेख कवी अववैयर यांच्या गाण्यांत आढळतो ज्यात ते भगवान मुरुगाची स्तुती करीत आहेत आणि जे पलानी मुरुगन मंदिराच्या कथेचा एक भाग आहे. पलानी चा उच्चार साधारण ɻ (ழ) वापरुन उच्चारली जाते आणि अशा प्रकारे 'झेड' चा वापर "पझानी" म्हणून करतात.

इतिहास[संपादन]

पळणी मंदिरातील तामिळ शिलालेख

प्राचीन तामिळ धार्मिक ग्रंथांमध्ये या स्थानाचा संदर्भ आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार, नारद ऋषी एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव यांच्या आकाशातील दरबारात गेले आणि ज्ञान-पाझम (शब्दशः ज्ञानाचे फळ), ज्यामध्ये बुद्धीचे अमृत होते, ते त्यांना अर्पण केले. भगवान शिव यांनी ते फळ आपल्या दोन मुलांमध्ये, गणेश आणि मुरुगा, यांना विभाजून देण्याचा हेतू व्यक्त केला तेव्हा नारदांनी ते फळ न कापण्याचा सल्ला दिला. शंकरांनी त्याच्या दोन मुलांपैकी जो कोणी सर्वप्रथम तीनदा जग परिभ्रमण करेल त्याला ते फळ देण्याचे ठरविले. हे आव्हान स्वीकारून मुरुगा यांनी आपले वाहन मोर यावर बसून जग परिभ्रमणाचा प्रवास सुरु केला. तथापि, गणेशाने त्यांचे जग हे त्यांचे पालक शिव आणि पार्वती यांच्यातच सामावलेले आहे असे सांगून त्यांचीच परिक्रमा केली. [४] गणेशाच्या या विवेकबुद्धीने प्रसन्न होऊन भगवान शिवने हे फळ त्याला दिले. जेव्हा मुरुगा परत आला, तेव्हा त्याचे प्रयत्न व्यर्थ गेलेले ऐकून त्याला राग आला. त्यांनी कैलास सोडले व दक्षिण भारतातील पलानी डोंगरावर त्यांचे वास्तव्य हलवले. असे मानले जाते की मुरुगाला बालपणापासूनच परिपक्व होण्याची गरज भासू लागली आणि म्हणूनच त्याने एकांतात राहणे पसंत केले आणि त्याने आपली सर्व वस्त्रे व दागिने यांचा त्याग केला. स्वतःला समजून घेण्यासाठी ते ध्यान मग्न झाले. पलानी आणि बहुतेक दिंडुक्कल जिल्हा हा तामिळ देशातील कोंगू नाडू भाग होता. पलानी व ओडदानच्राम तालुक्यांचा उत्तरी भाग हा अंदू नाडू उप-प्रांताचा भाग असल्याचे मानले जाते, तर उर्वरित भाग वैयापुरी नाडूचा होता. हा सर्व परिसर कोईंबतूर आणि मदुराईच्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. १८ व्या शतकात, हैदर अली आणि त्याचा मुलगा, टिपू सुलतान याने येथे राज्य केले. तिसऱ्या एंग्लो-म्हैसूर युद्धानंतर येथे इंग्रजांनी राज्य केले.


संदर्भ[संपादन]

  1. ^ {{cite web|title=Kongu region|url=http://www.coimbatore.com/kongunadu/
  2. ^ "Kongu Nadu". www.coimbatore.com. 3 December 2019 रोजी पाहिले.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2011census नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "Dhandapani Murugan Kovil". tamilnadu.com. General Interactive, LLC. Archived from the original on 7 मार्च 2013. 28 जानेवारी 2017 रोजी पाहिले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.