सिमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिमेंट प्लांट

प्रामुख्याने चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असे म्हणतात.

सिमेंट हा पायाभूत सुविधा क्षेत्राचा आधारस्तंभ आहे असे मानले जाते. रस्ते, पुल, घरे, औद्योगिक व व्यावसायिक इमारती, धरण अशा सगळ्या बांधकामांसाठी त्याचा वापर होतो.

यासाठी काँक्रीट वापरले जाते त्यात सिमेंटचा प्रामुख्याने उपयोग होतो. वाळू , खडी, याचे व सिमेंटचे पाण्याबरोबर व इतर काही घटकांबरोबर मिश्रण करून त्यापासून काँक्रीट बनवले जाते. पाण्यामुळे रासायनिक क्रिया होऊन हे अतिशय मजबूत बनते.

चुनखडी, [[सिलिकॉन ऑक्साईड, ॲल्युमिनियम, आयर्न ऑक्साईड व इतर काही घटक यांचे मिश्रण मोठ्या भट्टीत प्रचंड उष्णतेत जाळून त्यापासून क्लिकर नावाचे मिश्रण बनते. यामध्ये जिप्सम, पोझ्झोलाना (एक प्रकारची चिकणमाती), फ्लायअश, स्लॅग असे आणखी काही घटक मिसळवून व त्याची बारीक भुकटी करून त्यापासून विविध प्रकारचे सिमेंट बनते.

इतिहास[संपादन]

२०१० मधील जागतिक सिमेंट उत्पादन

भारतात इ.स. १९१४ मध्ये पोरबंदर इथे पहिली वार्षिक १००० टन उत्पादनक्षमता असलेली सिमेंट कंपनी स्थापन करण्यात आली.

प्रकार[संपादन]

ऑर्डीनरी पोर्टलँड सिमेंट, पोर्टलँड पोझ्झोलाना सिमेंट, व्हाईट सिमेंट अशा १३ प्रकारच्या सिमेंटचे देशात उत्पादन होते.

प्रदूषण[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. युरोपियन सिमेंट असोसिएशन
  2. सिमेंट बनवण्याचे चलचित्र