प्रजासत्ताक दिन
देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
अनुक्रमणिका |
[संपादन] भारतीय प्रजासत्ताक दिन
दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. ही दरवर्षी भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.
[संपादन] पाकिस्तान प्रजासत्ताक दिन
दरवर्षी २३ मार्च ह्या दिवशी साजरा केला जातो. २३ मार्च १९५६ सालामध्ये संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.
[संपादन] इराणचा प्रजासत्ताक दिन
दरवर्षी १ एप्रिल ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.
[संपादन] नेपाळचा प्रजासत्ताक दिन
दरवर्षी २८ मे ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला. माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या दशकाच्या संघर्षानंतर शेवटच्या सम्राटाचा पाडाव करून २८ मे २००६ मध्ये लोकशाही स्थापन केली गेली.