युरोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोप
युरोप
युरोप
क्षेत्रफळ १,०१,८०,००० वर्ग किमी
लोकसंख्या ७३.१ कोटी (२००९)
लोकसंख्या घनता ७० / वर्ग किमी
देश ५०

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्रकॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

भौगोलिक विभाग[संपादन]

संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्याख्येनुसार युरोपातील प्रदेश:
  पूर्व युरोप

भौगोलिक दृष्ट्या युरोप खंड चार प्रदेशांमध्ये विभागला जातो.

अनेकदा मध्य युरोप हा देखील एक भौगोलिक प्रदेश समजला जातो.

घटक देश[संपादन]

युरोप खंडामध्ये एकूण ५० मान्यताप्राप्त व सार्वभौम देश आहेत. ह्यामधील कझाकस्तान व्यतिरिक्त इतर सर्व देश युरोपाच्या परिषदेचे सदस्य आहेत तर २००७ सालापासून २७ युरोपियन देश युरोपियन संघाचे सदस्य आहेत.

देशाचे नाव व ध्वज क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
आल्बेनिया आल्बेनिया २८,७४८ ३,६००,५२३ १२५.२ तिराना
आंदोरा आंदोरा ४६८ ६८,४०३ १४६.२ आंदोराला व्हेया
आर्मेनिया आर्मेनिया २९,८०० ३,२२९,९०० १०१ येरेवान
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया ८३,८५८ ८,१६९,९२९ ९७.४ व्हियेना
अझरबैजान अझरबैजान ८६,६०० ८,६२१,००० ९७ बाकु
बेलारूस बेलारुस २०७,६०० १०,३३५,३८२ ४९.८ मिन्‍स्‍क
बेल्जियम बेल्जियम ३०,५१० १०,२७४,५९५ ३३६.८ ब्रसेल्स
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बोस्निया आणि हर्जेगोविना ५१,१२९ ४,४४८,५०० ७७.५ साराजेव्हो
बल्गेरिया बल्गेरिया ११०,९१० ७,६२१,३३७ ६८.७ सोफिया
क्रोएशिया क्रोएशिया ५६,५४२ ४,४३७,४६० ७७.७ झाग्रेब
सायप्रस सायप्रस ९,२५१ ७८८,४५७ ८५ निकोसिया
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७८,८६६ १०,२५६,७६० १३०.१ प्राग
डेन्मार्क डेन्मार्क ४३,०९४ ५,३६८,८५४ १२४.६ कोपनहेगन
एस्टोनिया एस्टोनिया ४५,२२६ १,४१५,६८१ ३१.३ तालिन
फिनलंड फिनलंड ३३६,५९३ ५,१५७,५३७ १५.३ हेलसिंकी
फ्रान्स फ्रान्स ५४७,०३० ५९,७६५,९८३ १०९.३ पॅरिस
जॉर्जिया जॉर्जिया ६९,७०० ४,६६१,४७३ ६४ त्बिलिसी
जर्मनी जर्मनी ३५७,०२१ ८३,२५१,८५१ २३३.२ बर्लिन
ग्रीस ग्रीस १३१,९४० १०,६४५,३४३ ८०.७ अथेन्स
हंगेरी हंगेरी ९३,०३० १०,०७५,०३४ १०८.३ बुडापेस्ट
आइसलँड आइसलॅंड १०३,००० ३०७,२६१ २.७ रेयक्यविक
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड ७०,२८० ४,२३४,९२५ ६०.३ डब्लिन
इटली इटली ३०१,२३० ५८,७५१,७११ १९१.६ रोम
कझाकस्तान कझाकस्तान २,७२४,९०० १५,२१७,७११ ५.६ नुरसुल्तान
लात्व्हिया लात्व्हिया ६४,५८९ २,३६६,५१५ ३६.६ रिगा
लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन १६० ३२,८४२ २०५.३ फाडुट्स
लिथुएनिया लिथुएनिया ६५,२०० ३,६०१,१३८ ५५.२ व्हिल्नियस
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग २,५८६ ४४८,५६९ १७३.५ लक्झेंबर्ग
मॅसिडोनिया मॅसिडोनिया २५,३३३ २,०५४,८०० ८१.१ स्कोप्ये
माल्टा माल्टा ३१६ ३९७,४९९ १,२५७.९ व्हॅलेटा
मोल्दोव्हा मोल्दोव्हा ३३,८४३ ४,४३४,५४७ १३१.० चिशिनाउ
मोनॅको मोनॅको १.९५ ३१,९८७ १६,४०३.६ मोनॅको
माँटेनिग्रो मॉंटेनिग्रो १३,८१२ ६१६,२५८ ४४.६ पॉडगोरिका
नेदरलँड्स नेदरलँड्स ४१,५२६ १६,३१८,१९९ ३९३.० ऍमस्टरडॅम
नॉर्वे नॉर्वे ३२४,२२० ४,५२५,११६ १४.० ओस्लो
पोलंड पोलंड ३१२,६८५ ३८,६२५,४७८ १२३.५ वारसॉ
पोर्तुगाल पोर्तुगाल ९१,५६८ १०,४०९,९९५ ११०.१ लिस्बन
रोमेनिया रोमेनिया २३८,३९१ २१,६९८,१८१ ९१.० बुखारेस्ट
रशिया रशिया १७,०७५,४०० १४२,२००,००० २६.८ मॉस्को
सान मारिनो सान मरिनो ६१ २७,७३० ४५४.६ सान मरिनो
सर्बिया सर्बिया ८८,३६१ ९,६६३,७४२ १०९.४ बेलग्रेड
स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ४८,८४५ ५,४२२,३६६ १११.० ब्रातिस्लाव्हा
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया २०,२७३ १,९३२,९१७ ९५.३ लियुब्लियाना
स्पेन स्पेन ५०४,८५१ ४५,०६१,२७४ ८९.३ माद्रिद
स्वीडन स्वीडन ४४९,९६४ ९,०९०,११३ १९.७ स्टॉकहोम
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ४१,२९० ७,५०७,००० १७६.८ बर्न
तुर्कस्तान तुर्कस्तान ७८३,५६२ ७०,५८६,२५६ ९३ अंकारा
युक्रेन युक्रेन ६०३,७०० ४८,३९६,४७० ८०.२ कियेव
युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन २४४,८२० ६१,१००,८३५ २४४.२ लंडन
व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी ०.४४ ९०० २,०४५.५ व्हॅटिकन सिटी
एकूण १०,१८०,००० ७३१,०००,००० ७०

वरील ५० स्वतंत्र देशांव्यतिरिक्त खालील अंशतः मान्य देश तसेच वरील देशांच्या अखत्यारीखालील प्रदेश युरोपामध्ये मोडले जातातः

नाव व ध्वज क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
अबखाझिया ध्वज अबखाझिया ८,४३२ २,१६,००० २९ सुखुमी
ऑलंड द्वीपसमूह ऑलंड द्वीपसमूह (फिनलंड) १,५५२ २६,००८ १६.८ मरीहम
फेरो द्वीपसमूह फेरो द्वीपसमूह (डेन्मार्क) १,३९९ ४६,०११ ३२.९ तोर्शाउन
कोसोव्हो कोसोव्हो १०,८८७ २,१२६,७०८ २२० प्रिस्टिना
आईल ऑफ मान आईल ऑफ मान ५७२ ७३,८७३ १२९.१ डग्लस
गर्न्सी गर्न्सी ७८ ६४,५८७ ८२८.० सेंट पिटर पोर्ट
जर्सी जर्सी ११६ ८९,७७५ ७७३.९ सेंट हेलियर
जिब्राल्टर जिब्राल्टर (ब्रिटन) ५.९ २७,७१४ ४,६९७.३ जिब्राल्टर
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख 11,458 138,800 12 स्टेपनाकर्ट
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस 3,355 265,100 78 निकोसिया
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया 3,900 70,000 18 त्सिखिनवाली
नॉर्वे स्वालबार्डयान मायेन (नॉर्वे) 62,049 2,868 0.046 लॉंगयरबेन
ट्रान्सनिस्ट्रिया ध्वज ट्रान्सनिस्ट्रिया b[›] 4,163 537,000 133 तिरास्पोल

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: