मानवी विकास निर्देशांक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा सूचकांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.
इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थत़ज्ज्ञ महबूब उल हक ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.
२००९ अहवाल [संपादन]
५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.[१]
|
|
|