सायबेरिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गुणक:
सायबेरिया (रशियन: Сибирь) हा रशिया देशामधील एक अवाढव्य प्रदेश आहे. उत्तर आशिया हा शब्दप्रयोग जवळजवळ संपूर्णपणे सायबेरियाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. सायबेरियाने रशियाच्या एकुण क्षेत्रफळापैकी ७७% भाग व्यापला आहे पण रशियाच्या एकुण लोकसंख्येच्या फक्त २५% लोकसंख्या सायबेरियामध्ये वसलेली आहे.
सायबेरियाच्या पश्चिमेला उरल पर्वत, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला प्रशांत महासागर व दक्षिणेला कझाकस्तान, चीन व मंगोलिया हे देश आहेत. नोव्होसिबिर्स्क हे सायबेरियामधील सर्वात मोठे शहर तर ओम्स्क, ईर्कुट्स्क व क्रास्नोयार्स्क ही इतर शहरे आहेत.
हेसुद्धा पाहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |