इस्तंबूल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| इस्तंबूल İstanbul |
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | मर्मरा प्रदेश |
| प्रांत | इस्तंबूल प्रांत |
| क्षेत्रफळ | ५,३४३ वर्ग किमी |
| लोकसंख्या | |
| - शहर | १,२७,८२,९६० (इ.स. २००९) |
| - घनता | २,३९२ प्रति वर्ग किमी |
| अधिकृत संकेतस्थळ | |
इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे.
या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टँटिनोपल या नावांनेही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४ व इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते.
बाह्य दुवे [संपादन]
- महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ (तुर्की मजकूर)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |