इ.स. १९२७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
| दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
| वर्षे: | १९२४ - १९२५ - १९२६ - १९२७ - १९२८ - १९२९ - १९३० |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- मे ९ - ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे नवीन राजधानी कॅनबेरा येथील पहिले अधिवेशन सुरू.
- मे ११ - चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कर पुरस्कार बहाल करते.
- मे १८ - मिशिगनच्या बाथ शहरात शाळेच्या अधिकाऱ्याने शाळेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ४५ ठार.
- मे ३१ - फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.
- जुलै २० - मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
- ऑगस्ट १ - चीनी गृहयुद्ध - नान्चांगचा उठाव.
जन्म [संपादन]
- जानेवारी १० - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
- जानेवारी ३० - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- फेब्रुवारी २० - सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.
- मार्च ११ - रॉन टॉड, ब्रिटीश कामगारनेता.
- मार्च ११ - रॉबर्ट मोसबाकर, अमेरिकन राजकारणी.
- मार्च ११ - रेमंड जॅकसन, ब्रिटीश व्यंगचित्रकार.
- मार्च ११ - ऍलन बेट्स, रॉयल व्हेटरनरी कॉलेजचा मानद ज्येष्ठ प्राध्यापक.
- एप्रिल २७ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
- मे ९ - मॅन्फ्रेड आयगेन, जर्मन जैवभौतिकशास्त्रज्ञ.
- मे १० - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
- जुलै १५ - कार्मेन झपाटा, अभिनेत्री.
- जुलै २६ - जी.एस. रामचंद भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २५ - राम नारायण
मृत्यू [संपादन]
- जुलै २० - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.