येशू ख्रिस्त
येशू ख्रिस्त (जन्म इसवीसनपूर्व ८ ते २, मृत्यू इसवीसन २९ ते ३६ यादरम्यान) हा ख्रिस्ती धर्माच्या केंग्रस्थानी आहे. त्याला मरियम पुत्र(मेरीचा मुलगा), नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसाही असेही म्हटले जाते, ख्रिस्ती धर्मग्रंथातील(बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्या जन्मासंबंधी, तसेच त्याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. हा उपग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ मानला जातो.
अनुक्रमणिका |
नावाचा अर्थ [संपादन]
मत्तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्तकातल्या पहिल्या अध्यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की,
- वह पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्योंकि वह अपके लोगोंका उन के पापोंसे उद्वार करेगा। (हिन्दी)
- तिला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त करेल.
येशू ख्रिस्ताला, 'इब्री(हिब्रू) भाषेत यशुआ तर ग्रीक भाषेत येसूस' म्हटले आहे येशू हे याच शब्दाचे मराठी रूपांतर आहे, त्याचा अर्थ सोडविणारा, येशू सर्व मानवजातीला पापांच्या बंधनातून सोडविण्याकरिता आला, असे पवित्र शास्त्र(=बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळते अशी ख्रिश्चन लोकांची कल्पना आहे. (प्रेषित(?). ४.१२)
ख्रिस्त्ा हा शब्द ग्रीक भाषेतील ख्रिस्तोस या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ अभिषिक्त असा होतो. यहूदी लोकांना(ज्यू धर्मीयांना) याव्हे नावाच्या देवाकडून ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्यात आले होते, असा समज आहे..
जन्म [संपादन]
येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून पाळला जातो.[१]