Jump to content

शिवाजीनगर (पुणे) एस.टी. बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक महाराष्ट्राच्या पुणे शहरातील मोठे बस स्थानक आहे. हे स्थानक शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक यांच्या लगतच आहे.

हे स्थानक पुण्याला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील मोठ्या शहरांशी बससेवेने जोडते. येथून महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, अहमदनगर, सातारा, सोलापूर, शिर्डी, धुळे, अकोला, मनमाड सारख्या शहरांना थेट बससेवा आहे. याशिवाय येथून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील अनेक शहरांपर्यंत बससेवा उपलब्ध आहे.

फलाटनिहाय गंतव्यस्थाने

[संपादन]
फलाट क्र. गंतव्यस्थाने
अलिबाग, मुरुड जंजीरा, रोहा, भिरा, महाड, पेण, बोरिवली, कल्याण, कुर्ला, मुंबई सेंट्रल, दादर, शहापूर, सांगली, कोल्हापूर
गळवणे, राजूर, बेजारे, चाकण, वेल्हे, वडोदरा, पालिताणा, अमदावाद, पेठ, लासलगाव, इगतपुरी, नासिक, संगमनेर, भंडारदरा, अकोला, पोखरी, खिरेश्वर, आळे फाटा, पिंपळगाव, ओतूर, जुन्नर, त्र्यंबकेश्वर
मंचर, भीमाशंकर, आसानसे, पिंपरखेड, ढोणे, कवठेमहांकाळ, वडगांव पीर, नारायणगांव, पाबळ, कडूस
साक्री, जव्हार, नवापूर, सुरत, कळवण, सटाणा, हिम्मतनगर, धुळे, अमळनेर, उज्जैन, इंदूर, मालेगांव, नांदगाव, कोपरगाव, शिर्डी, विजापूर
जालना, शेवगाव, कन्नड, अंबड, पैठण, सिल्लोड, शिरूर, सिद्धटेक, विसापूर, शनी शिंगणापूर, अष्टविनायक यात्रा
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, पुसद, मलकापूर, रावेर, बुलढाणा, शेगांव, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, गंगाखेड, देगलूर, परळी, भुसावळ
इंदूर, शिरपूर, धुळे, चोपडा, अक्कलकुवा, नंदुरबार, मालेगाव, शहादा, मनमाड, शिर्डी, लासलगाव, बीड, नेवासा
पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर, अहमदनगर, पंढरपूर, मंगळवेढा
तळेगाव, मुळशी, पौड, रहू, फलटण, सासवड, जेजुरी, बारामती, भोर
१० नाशिक (निमआराम, दर ३० मिनिटांनी)
११ सोलापूर, बेळ्ळारी, हैदराबाद, उमरगा, तुळजापूर, विजापूर, बागलकोट, तालिकोट, देगलूर, बार्शी, धाराशिव, उदगीर, औसा, कळंब, निलंगा, बसमत, धारूर, अक्कलकोट