शहापूर

शहापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. वासिंद, आसनगाव रेल्वे स्थानक, तानशेत रेल्वे स्थानक, आटगाव रेल्वे स्थानक, खर्डी रेल्वे स्थानक, उंबरमाळी रेल्वे स्थानक तसेच कसारा रेल्वे स्थानक ही रेल्वे स्थानके असून ते मुंबईच्या सीएसएमटी ते कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस पासून ८५ कि. मी.आणि ९४ कि. मी. अंतरावर आहेत.
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. मुंबईची व ठाण्याची पिण्याच्या व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज पूर्णतः शहापूर तालुका भागवतो.सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.चौढा वीज प्रकल्प कार्यान्वित आहे. पाण्यासाठी, धरणासाठी प्रसिद्ध असलेला तालुका, मात्र आदिवासी भागात तहानलेला आहे.सदर माहिती अभ्यासक अनिल सुर्यकांत दाभोळकर यांनी दिली आहे.
शेरे, शेणवे, किन्हवली, गुंडे,माहुली, अघई वै. जुनी गावे आहेत.
शहापूर मध्ये अनेक कंपन्या आहेत. जुना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन) असून, नवीन समृद्धी महामार्ग शहापूर येथून गेला आहे. शहापूर हा मुंबई, नासिक, अहिल्या नगर जोडायला सोपे साधन आहे. स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. रामजीं पितळे, सिंधूजीं पितळे, हे शहापूर मधिल मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. किसानजीं भेरे ह्यांचेही मोठे योगदान होते. मधुकर अंबावणे ( शेरे), कामेरकर(वासिंद), हेही स्वातंत्र्य सैनिक होते.
विशेष महत्त्वपूर्ण माहिती
[संपादन]शहापूरची संक्षिप्त ओळख ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. हा भाग पूर्वी कोळवन म्हणून ओळखला जाई.. ह्या भागावर जव्हार च्या मुकणे घराण्याचे साम्राज्य होते. तेव्हा मुकणे आदिलशहाचे अंकित होते.. छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाईंच्या पोटी असताना 4/5 महिन्याच्या गरोदर जिजाई माहुली येथे राहिल्या होत्या..छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण काही काळ माहुली किल्ल्यावर गेले आहे.हा किल्ला पहिल्या वेळी महाराजाना जिंकता आला नाही..नंतर महाराजांनी सहज साध्य करत जिंकला.. तालुक्यात आजा पर्वत (गुंडे )आहे. तेथे श्रीराम पुत्र लवकुश यांचा जन्म झाला होता. वाल्मिकी ऋषींचा आश्रम तेथे होता..अशी लोकमान्यता आहे.एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९चौ.कि.मी. आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. येथे हिंदु समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यात हिंदू आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. हिंदू समाजाअंतर्गत (ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, कातकरी,महादेव कोळी, )या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत हिंदू कुणबी व हिंदू आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरू झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरू झाले. १ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरातThe Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात येऊन वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. वासिंद रेल्वे स्थानक हे आशियातील 8 वे स्थानक आहे.७ नोव्हेंबर १८५५ रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंडला पोहचून ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून हिंदू आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता. शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरू झाल्या थळघाट सुरू होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, तानशेत, तांबडमाळ आटगाव, उंबरमाळी,खर्डी व कसारा ही रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. ब्रिटिश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव हे नाव अलीकडील असून त्याचे पूर्वीचे नाव शहापूर होते.आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर तर आटगांव स्थानकापासून ५ कि. मी. अंतरावर आहे. ब्रिटिश काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत. रेल्वे व रस्ता वाहतुकींच्या सोयीमुळे शहापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतरवसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशीवस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही.माहुली किल्लाव पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढेमध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी “कोळवण” तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील “मिलिटरी डीपार्टमेंट डायरी” क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स. १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवणचे रूपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते. शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन जास्त असून “भाताचे कोठार” म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई.ब्रिटिश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू नाही.नो केमिकल झोन मुळे औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत. तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून ही नदी येथेउल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास मिळते. भारंगीनदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटिशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली.आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा (आटगांव स्टेशन) आणि वैतरणा-मोडकसागर (खर्डी स्टेशन) ही धरणे बांधण्यात आली. तर भातसा धरण (आटगांव स्टेशन) १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा,भातसा ही मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली,वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीनेउभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.
गंगा देवस्थान.. महादेवाची अनेक मंदिरे शहापूर तालुक्यात आहेत. पुनधे, मढ( गंसुमारे ७०० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या औदुंबराच्या छायेखाली एक साधुपुरुष ध्यान करत असे. हा साधुपुरुष दर एकादशी व पौर्णिमेला नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी जात असे. साधू महाराज र्यंबकेश्वराहून नित्यपुजनासाठी गंगाजल आणत. कालांतराने त्यांना वार्धक्यामुळे शहापूरहून त्र्यंबकेश्वरला जाणे अवघड होवू लागले. नियमात खंड पडत असल्याने व गंगाभेत होत नसल्याने ते व्यथित झाले. त्यांनी औदुंबराच्या व्रुक्षाखाली आराधना सुरू केली. त्यावेळी साक्षात गोदावरीने दृष्टांत देऊन भेटीला येते असे सांगितले आणि ज्या औदुंबराच्या व्रुक्षाखाली ते आराधना करत असत, तेथे ती नदी प्रकट झाली, ही नदी म्हणजे गोदावरी नदी असे मानले जाते. त्यामुळे पुढे हे स्थळ गंगास्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. प्रकट झालेल्या नदीसाठी कुंड बांधण्यात आले. गंगा गोज्रेश्वर मढ, पुनधे इत्यादी ठिकाणी अनेक ऐतिहासिक शिव मंदिरे आहेत. मात्र शहापूर भारंगी नदीकाठी असलेले, गंगा देवस्थान ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थान आहे.
येथे सुमारे ७०० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या औदुंबराच्या छायेखाली एक साधुपुरुष ध्यान करत असे. हे साधुपुरुष दर एकादशी व पौर्णिमेला नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी जात असे. साधू महाराज त्रंबकेश्वर येथून नित्यपुजनासाठी गंगाजल आणत. कालांतराने त्यांना वार्धक्यामुळे शहापूरहून त्र्यंबकेश्वरला जाणे अवघड होवू लागले. नियमात खंड पडत असल्याने गंगा गोदावरी भेट होत नसल्याने ते व्यथित झाले. त्यांनी औदुंबराच्या खाली आराधना सुरू केली. त्यावेळी साक्षात माता गोदावरीने दृष्टांत देऊन भेटीला येते असे सांगितले आणि ज्या औदुंबराच्या वृक्षाखाली ते आराधना करत असत, तेथे ती नदी प्रकट झाली, ही नदी म्हणजे गोदावरी नदी असे मानले जाते. त्यामुळे पुढे हे स्थळ गंगास्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. प्रकट झालेल्या नदीसाठी कुंड बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेथे मुक्काम केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेथे दुसरे काशी विश्वेश्वर मंदिर बांधले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीशी एकनिष्ठ असलेल्या त्यांच्या पंतप्रधान यांनी त्या मंदिराचा उद्धार केला. तेथे मोठी यात्रा भरते.
भूगोल
[संपादन]शहापूर १९.४५ अ़क्षांश उत्तरेस व ७३.३३३ रेखांश पूर्वेस असून समुद्र सपाटीपासून ४५ मी. उंचीवर वसले आहे.
हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
शहापूर तालुक्यातील लोकसंख्या प्रमाण...
[संपादन]विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, नंतर मुस्लिम जैन, बौद्ध लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने म.ठाकूर, महादेव कोळी,मल्हार कोळी कुणबी, आगरी,दै.ब्रा.सोनार, ब्राह्मण, तेली, शिंपी,वैश्य वाणी, 96 कुळी, क्षत्रिय मराठा, लेवा पाटीदार, वारली,कातकरी इत्यादी जातींचे लोक आहेत.
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमित्त मुंबईस ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.पालेभाज्या लागवड होते..शेतीप्रमाणेच तालुक्यात दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय सुद्धा केले जातात. हिंदू आदिवासी समाज पळसाची पाने तोडून विकतात. करवंदे, जांभूळ, रानमेवा,तोरणे हातूरणे, बिंदूकली, आवळं, भोपट, खुरासनी, ससेकान, कंद, करांदी, कोनी, शेवलं, अशी अनेक रानमेवे व रानभाज्या उपलब्ध आहेत..
शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ 223 गावे येतात. त्यांपैकी किन्हवली, डोळखांब, शेणवा, वासिंद, कसारा, खर्डी ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. तालुक्यात,शहापूर, तानसा, भातसानगर, अघई,नडगांव, शिरगांव, अल्याणी, अस्नोली, बामणे, शेरे,शेई,अंबर्जे, दळखन, खरीड, गुंड्याचा पाडा, टेंभूर्ली, माणगाव, धसई, अंदाड, चोंढे , नेहरोली, गेगाव, शेंद्रुण, अल्याणी, दहिवली, दहिवलीपाडा, लेनाड खुर्द ,लेनाड बुद्रुक , सावरोली, सोगाव, टाकीपठार, गुंडे, आपटे अशी महत्त्वाची गावे आहेत.
पर्यटन स्थळे
[संपादन]- माहुली किल्ला, माहुली, पिवळी खोर, चांदरोटी, शिवाजी महाराज यांच्या माता जिजाई ह्या गरोदर पणात 4/5 महिने राहिल्या होत्या, छत्रपती शिवाजी महाराज संस्कार भूमी, शहाजी राजे भोसले निवासस्थान, अनेक लढायांचा साक्षीदार, जव्हार संस्थांनाचे वर्चस्व, आदिलशाह वर्चस्व.. मोडून स्वराज्यात सामील.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंतप्रधान यांनी त्याची डागडुजी केली....
- अशोका धबधबा
- जांभे धरण
- जैन मानसमंदिर,सावरोली,माहुलीजवळ
- शेलवली श्री.खंडोबाची प्रती जेजूरी
- पांडवलेणी पुरातन श्री. शिव मंदिर, पुणधे-आटगांव
- टाकीपठार, तीर्थ क्षेत्र
- आजोबा पर्वत ( भगवान श्रीराम यांच्या पुत्रांचा जन्म स्थान, माता सीता भगवान श्रीराम, श्री. हनुमान यांच्या वास्तव्य, ऋषीं वाल्मिकी यांचा आश्रम..)
- चोंढे धबधबा, वीजप्रकल्प..
- गंगा देवस्थान- गोदावरी सर्वप्रथम येथे आणली. मच्छिंद्रनाथ तपश्चर्या स्थान ६ महिने कालावधी.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन स्थान.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकनिष्ठ पंतप्रधान यांनी केला जीर्णोद्धार
- कुंडन धबधबा पर्यटन
- मढ गंगा गोजरेश्वर देवस्थान..
शहापूर तालुक्यातील नद्या
[संपादन]- भातसा
- तानसा
- भारंगी
- मुरबी
- शाई
- वैतरणा