पुसद
?पुसद महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
गुणक: 19°52′12″N 77°46′48″E / 19.87°N 77.78°E | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | यवतमाळ |
भाषा | बंजारी,मराठी |
तहसील | पुसद |
पंचायत समिती | पुसद |
कोड • पिन कोड |
• ४४५२०४ |
गुणक: 19°52′12″N 77°46′48″E / 19.87°N 77.78°E
पुसद हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक शहर व तालुक्याचे ठिकाण आहे. पुस ही नदी पुसद शहरातून वाहते. लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते. स्वातंत्र्यपूूर्व काळात भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद येथे झाला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे पुसदचेच होते. पुसदला वेगळा जिल्हा म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. पुसद येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजारपेठ आहे.
पुसद या शहरातून सुधाकर राव नाईक हे मुख्यमंत्री पदी विराजमान होते.पुसद हा महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारा एक शहर आहे
पुसद हा यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखते जाते.पुसद हा यवतमाळ जिल्यात दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. पुसद या शहराला अलग जिल्हा द्या पाहिजे कारण शिवसेनेची खासदार भावना गवळी यांनी काही काम नाही केले पुसद मध्ये मागच्या 23 वर्षपासून रेल्वे मागत आहे आतापर्यंत इथे रेल्वे आली नाही पुसद इथे सर्व महाविद्यालय आहे.पुसद इथे सर्वात जास्त बंजारा समाज राहते.इथे कोटल्या पण निवडणूक मध्ये नाईक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे।सध्या इथे मनोहर नाईक शासन करत आहे (अन्न मंत्री 2009 काँग्रेस सरकार).
- P N कॉलेज हे सर्वात मोठे कॉलेज
- श्री शिवाजी विद्यलाय हि सर्वात मोठी शाळा
- सुधाकर राव नाईक फार्मसी कॉलेज
- बाबासाहेब नाईक इंजिनीरिंग कॉलेज
- वसंतराव नाईक विद्यलाय
- आयुर्वेद मेडिकल कॉलेज
- दुग्ध तंत्रज्ञान विद्यालय
- पुसद या शहराला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर सुद्धा म्हणतात
स्वप्नील रामेश्वर चव्हाण साई(इ)
भौगोलिक[संपादन]
पुसद हे शहर डोंगराळ भागात येते. हे शहर डोंगरांनी वेढलेले असून याच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. पुसद येथे येण्यासाठी किंवा येथून जाण्यासाठी घाट ओलांडावा लागतो.
शिक्षण[संपादन]
पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. येथे अनेक नामवंत काॅलेजेस व शाळा आहेत. बाबासाहेब नाईक अभियांत्रीकी काॅलेज, फुलसिंग नाईक महाविद्यालय, को.दौ.विद्यालय, सुधाकरराव नाईक इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, दुग्धव्यवसाय तंत्रज्ञान कॉलेज, पुसद ही येथील प्रमुख विद्यालये आहेत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके |
---|
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ |