नंदूरबार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नंदुरबार या पानावरून पुनर्निर्देशित)

नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे, आणि त्या नावाचे शहर हे त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्रगुजरात राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रपळ ५०३५ चौरस किमी आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१च्या जनगणनेनुसार).

विभाग[संपादन]

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी महाल/धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर असे ६ तालुके आहेत.

भुगोल[संपादन]

सातपुडा पर्वताच्या रांगेत हे गाव वसलेले आहे. येथे पाताळगंगा नावाची नदी आहे.

इतिहास[संपादन]

नंदुरबार परिसरावर पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते. इंग्रजांविरुद्ध लढा देतांना इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा नवयुवक सत्याग्रहादरम्यान पोलीसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने गावात हुतात्मा चौक आहे.

शिक्षण[संपादन]

एकलव्य विद्यालय, D.R.High school (श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल), डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार तालुका विधायक समितीचे (NTVSचे) G.T.P.(गजमल तुळशीराम पाटील) कॉलेज, यशवंत विद्यालय, Smt. H.G.Shroff High School (श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल)...अशा शाळा नंदुरबारमध्ये आहेत. येथे टिळक वाचनालय प्रसिद्ध आहे.

शिवाजीचा पुतळा[संपादन]

नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. या भागातून कुठलीही मिरवणूक, मोर्चा, रॅली गेल्यास त्या पुतळ्याला अभिवादन करूनच ती पुढे जात होती. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा पालिकेच्या तत्पुरत्या इमारतीत एका बंदिस्त खोलीत ठेवला होता. नंतर नागरिकांच्या मागणीवरून तो मोकळ्या जागेत आणण्यात आला. हाच पुतळा पूर्वी होता त्याच ठिकाणी पुनःस्थापित करावा, अशी मागणी एक वर्षभर होत होती. नगरपालिका त्यांच्या ताब्यात असलेला शिवाजीचा पुतळा बसवत नाही हे लक्षात घेता शिवसेनेने तसाच हुबेहुब पुतळा तयार करून तो २२ जानेवारी २०१७ या दिवशी सकाळी अकरा वाजता पालिका चौकात आणला. सोबत पुतळा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅण्डदेखील आणला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा पुतळा पालिका चौकात नाही तर व्यापार संकुलातच हवा होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी झाली. शेवटी शिवसैनिकांचा विजय झाल्याने पोलिसांनी तो पुतळा चौकात राहू द्यायला परवानगी दिली.

देवालये[संपादन]

  • दंडपाणेश्वर गणपती मंदिर - शेंदुर लावलेली मुर्ती आसुन देवस्थान जागृत आहे.
  • नीलकंठेश्वर महादेव मंदिर - पुरातन महादेवाचे मंदिर काळ्या पाषाणातले असून तांब्याची पिंड आहे
  • जोगेश्वरी देवी माळीवाडा - हे येथील ग्राम दैवत अर्थात गाव देवी चे मंदिर आहे.
  • मोठा मारुती - साडेसाती मध्ये येथे अनेक लोक दर्शनास येतात.
  • खोडाई माता - कथा - तापी नदीचे पाणी एका रात्रीत आणून सुर्योदयाच्या आत माझे मंदिर बांधा असा आदेश देवीने दिला. परंतु हे शक्य झाले नाही. तेव्हा देवीनेच झोपुन आपल्या शरीराने पाणी अडवले. यामुळे हे स्थान प्रसिद्ध झाले.
  • वाघेश्वरी देवी - टेकडीवर असलेले देवालय.

थंड हवेची ठिकाणे[संपादन]

शेती[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.