Jump to content

"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Aditya Jagadhane (चर्चा)यांची आवृत्ती 1604475 परतवली.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
ओळ १७४: ओळ १७४:
* मराठी रंगभूमी आणि गोमंतकाची देण ([[भिकू पै आंगले]])
* मराठी रंगभूमी आणि गोमंतकाची देण ([[भिकू पै आंगले]])
* हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीत पोर्तुगिजांचे आगमन आणि अस्त (कृष्णा शेटकर)
* हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीत पोर्तुगिजांचे आगमन आणि अस्त (कृष्णा शेटकर)

==गोव्यावरील इंग्रजी पुस्तके==
* Gova a Social History : 1510 -1640 (P.D. Xavier); राजहंस प्रकाशन


== पर्यटन ==
== पर्यटन ==

१७:३३, ३० नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

  ?गोवा
गोंय
भारत
—  राज्य  —
Map

१५° २४′ ०७″ N, ७४° ०२′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी
राजधानी पणजी
मोठे शहर वास्को द गामा
जिल्हे
लोकसंख्या
घनता
१४,५७,७२३ (२५ वे) (२०११)
• ३९०/किमी
भाषा कोकणी,मराठी
राज्यपाल मृदुला सिन्हा
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
न्यायालय मुंबई उच्च न्यायालय -पणजी,गोवा खंडपीठ
स्थापित ३० मे १९८७
विधानसभा (जागा) गोवा विधानसभा (४०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GA
संकेतस्थळ: गोवा सरकार संकेतस्थळ
गोवा चिन्ह
गोवा चिन्ह

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरमअरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वदक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणीमराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेतीमासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळकडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोहबॅाक्साईट ही खनिजे आढळतात.

पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्कोपोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.

निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.

नावाचा उगम

महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गुराख्यांचे राष्ट्र) असा केलेला आढळतो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये या भागाचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.

भूगोल

संगीत

गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात बांदोडे या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, पेडणे महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी.

सन १८७०च्या सुमारास गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.

गोव्यातील रेल्वे स्टेशने

  • करंजोळ (Caranzol)
  • करंबोळी (Carambolim)
  • करमाळी (Karmali)
  • कळंब (Kolamb)
  • कळें (Calem)
  • कुळे (Kulem)
दुधसागर धबधबा
दुधसागर धबधबा
दुधसागर धबधबा
दुधसागर धबधबा
दुधसागर धबधबा
  • काणकोण (Canacona)
  • कासुएं(Canasuaim)
  • कुडचडें (Curchorem)
  • चांदोरगोवा (Chandorgoa)
  • जुने गोवें (Old Goa)
  • तिविम (Tivim) (Thivim)
  • दाभोळी (Dabolim)
  • दूधसागर (Doodh Sagar) (Dudhsagar)
  • पेडणे (Pernem)
  • बारकें (Barcem)
  • बाली (Bali)
  • मडगाव (Margao) (Margaon)
  • मयें (Maem) (Mayem)
  • मेजोर्डा (Mejorda)
  • म्हापसा (Mapuca)
  • लोलियें (Loliem)
  • वास्को (Vasco)
  • वास्को द गामा(Vasco da Gama)-संभाजीनगर
  • वेर्णे (Verna) (Vernem)
  • सरजोरा (Sarzora)
  • सरौली(Saraulim) (Seraulim)
  • सांवर्डे (Sanvordem) सावरडें
  • सोनवली (Sonauli)

गोव्यातील रेल्वे स्टेशने नसलेली गावे

  • ओशेल (Oxel)
  • करंजोळ (Caranzol)
  • कळंगुट (Calangute)
  • कांसावली (Cansaulim)
  • कुट्टाळी (Cortalim)
  • कुडचडे (Curchorem)
  • कोळें (Collem/Colem)
  • तळावली (Talaulim)
  • पणजीं (Punjim)
  • पर्वरी (Porvorim)
  • फोंडा तालुका (Ponda)
  • बारदेश (Bardez)
  • मुरगांव (Mormugao), मार्मागोवा, मोर्मुगांव
  • मोले (Mollem/Molem)
  • शापोरा (Chapora)
  • शिवोलीं (Siolim)
  • सांगे तालुका (Sanguem)
  • सावर्डे (Sanvordem)
  • हडफडे (Arpora)
  • हणजुणे (Anjuna)

जिल्हे

हेसुद्धा पाहा: गोव्यामधील जिल्हे

गोव्यात २ जिल्हे आहेत - उत्तर गोवा जिल्हा आणि दक्षिण गोवा जिल्हा.

तालुके

गोव्यात १२ तालुके आहेत.

प्रमुख शहरे

संस्कृती

दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात आलेल्या नरकासुराच्या मिरवणुकीतील एक दृश्य (स्थळःम्हापसा)


गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळही तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारतातील हे एक राज्य आहे.

१.गोव्यात गणेश उत्सव,शिमगा हे सण विशेष उत्साहाने साजरे होतात.गणेश चतुर्थुला घराघरात मातीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा केली जाते. होळीला गोव्यात 'शिगमा' असे म्हटले जाते.

२. गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ.गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.यामधे वारूळाच्या मातीचा गोळा तयार करून भूदेवतेचा पूजाविधी म्हणून सुमारे तीन आठवडे स्रिया त्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात.जननशक्तीचे प्रतीक म्हणून ही वारूळाची पूजा केली जाते.

३.नवस बोलणे, अंगात देवी येणे,देवतेला कौल लावणे,पूजेसाठी नागवेली,नारळ,सुपारी यांचा वापर करणे,मांत्रिक किंवा देवर्षीचा सल्ला असे विधी गोव्यात प्रचलित आहेत.पंचमहाभूतांची पूजाही विशेष प्रचलित दिसते.

४.ग्रामीण देवदेवतांची पूजा करताना भैरोबा,काळभैरव,सिदोबा यांची पूजा केली जाते.रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते.

५. लळित,खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे.
[]

गोव्यातील मराठी संस्था

गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या(२०१३साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे. संस्थांची नावे :-

१. गोमंतक मराठी अकादमी

२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन

३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ

४. कोकण मराठी परिषद

५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा

६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती


गोव्यावरील मराठी पुस्तके

गोव्यावरील इंग्रजी पुस्तके

  • Gova a Social History : 1510 -1640 (P.D. Xavier); राजहंस प्रकाशन

पर्यटन

प्रमुख समुद्रकिनारे

  • कोलवा (Colva)
  • दोना पावला (Dona Paula)
  • मिरामार (Miramar)
  • कळंगुट (Calangute)
  • हणजुणे (Anjuna)
  • पाळोळे (Polem)
  • वागातोर (Vegator)
  • हरमल
  • आगोंद
  • बागा
  • मोरजी

अभयारण्ये

इतर ठिकाणे

  • दूधसागर धबधबा
  • आग्वाद किल्ला
  • मये तलाव (Mayem) (Maem)
  • केसरव्हाळ
  • मोवाचो गुणो
  • नेत्रावली धबधबा

बाह्यदुवे

संदर्भ

  1. ^ भोसले द.ता., लोकसंंस्कृृती बंंध अनुबंंध,पद्मगंंधा प्रकाशन २॰१॰