दक्षिण गोवा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दक्षिण गोवा
[[गोवा]] राज्याचा जिल्हा

१५° १८′ ००″ N, ७४° ००′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य [[गोवा]]
मुख्यालय मडगांव
तालुके
क्षेत्रफळ १,९६६ चौरस किमी (७५९ चौ. मैल)
लोकसंख्या ६,४०,५३७ (२०११)
लोकसंख्या घनता ३२६ प्रति चौरस किमी (८४० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ६४.५९%
साक्षरता दर ८७.५९%
लिंग गुणोत्तर ९८६ /
लोकसभा मतदारसंघ दक्षिण गोवा
मडगांव महापालिकेची इमारत

दक्षिण गोवा हा भारताच्या गोवा राज्याच्या दोन जिल्ह्यांपैकी एक आहे. दक्षिण गोव्याच्या उत्तरेस उत्तर गोवा जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्याचा उत्तर कन्नड जिल्हा तर पश्चिमेस अरबी समुद्र आहेत. मडगांव हे दक्षिण गोव्याचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. वास्को दा गामामुरगाव ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा साष्टी, केपे, मुरगाव, काणकोण, सांगे व धारबांदोडा ह्या सहा तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ वास्को दा गामापासून ५ किमी अंतरावर आहे. मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्यातील सर्वात वर्दळीचे स्थानक मडगांव शहरात स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]