Jump to content

भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्येनुसार सूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या येथे नोंदवली आहे. २०२४ पर्यंत, अंदाजे १.४८४ अब्ज लोकसंख्येसह, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.[] भारताने जगात फक्त २.४% क्षेत्र व्यापले आहे पण जगातील १७.५% लोकसंख्या येथे आहे.

आकडेवारीचा सारांश

[संपादन]

भारतीय लोकसंख्येची गणना पहिल्यांदा ब्रिटीश काळात १८७२ मध्ये झाली आणि स्वातंत्र्यानंतर १९५१ पासून दर १० वर्षांनी जनगणना होते.[] गृह मंत्रालयाच्या देखत असलेल्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त हे काम करतात व हे केंद्र सरकारच्या कामांमधील सर्वात मोठ्या व व्यापक कामांपैकी एक आहे.[]

नवीनतम लोकसंख्येचे आकडे भारताच्या २०११ च्या जनगणनेवर आधारित आहेत. २००१-११ च्या दशकात, भारताचा वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर २.१५% वरून १.७६% टक्क्यांवर घसरला आहे. दशवार्षिक जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवचा सर्वात वेगवान वाढ ५५.१% टक्के आहे व त्यानंतर पुडुचेरी (२८.१%), मेघालय (२७.९%) आणि अरुणाचल प्रदेश (२६%) आहे. नागालँडने सर्वात कमी (-०.६%) लोकसंख्या वाढ नोंदविली आहे.[] सर्वाधिल लोकसंख्याचे राज्य हे उत्तर प्रदेश असून केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली पहिली आहे. पहिली ५ राज्ये (उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश) मिळून देशाच्या जवळपास निम्मी (४७.९३%) लोकसंख्या आहे. राज्यांमध्ये सर्ताव कमी लोकसंखा सिक्कीमची असून लक्षद्वीप हा सर्वात कमी वस्तीचा केंद्रशासित प्रदेश आहे. देशाची राजधानी व प्रगत शहर असल्याने दिल्लीची घनता सर्वाधिक आहे तर थंड ओसाड व उंचावर वसलेल्या लडाखची घनता कमी आहे.

भारतात ६,४१,००० वस्ती असलेली ग्रामीण गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ६८% लोक या ग्रामीण भागात राहतात. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या हिमाचल प्रदेश (~९०%) असून सर्वात कमी ही राजधानीचे केंद्रशासित प्रदेश दिल्लीत (२.५%) आहे.[] १९९१-२००१ च्या दशाकात झालेल्या औद्योगिकीकरणाने शहरी लोकसंख्येत वाढ झाली व लहान खात्यावर, सरकारने इतर लहान शहरे आणि गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.[][] महाराष्ट्रात सर्वाधिक २३ लाख स्थलांतरित लोक वसले असून, त्यानंतर दिल्ली (१७ लाख), गुजरात (६.८ लाख) आणि हरियाणा (६.७ लाख) होते. आंतरराज्यीय स्थलांतरीतांच्या यादीत उत्तर प्रदेश (२६ लाख) आणि बिहार (१७ लाख) शीर्षस्थानी आहेत.[]

यादी

[संपादन]

भारताची जनगणना २०११ अनुसार
क्र.राज्यलोकसंख्या[][]%बदल
(२००१ ते २०१२)
ग्रामीणशहरीघनतालिंग गुणोत्तर
संख्या%संख्या%
१ (रा १)उत्तर प्रदेश१९९,८१२,३४११६.५१%२०.२%१५५,३१७,२७८७७.७३%४४,४९५,०६३२२.२७%८२८९१२
२ (रा २)महाराष्ट्र११२,३७४,३३३९.२८%१६%६१,५५६,०७४५४.७८%५०,८१८,२५९४५.२२%३६५९२९
३ (रा ३)बिहार१०४,०९९,४५२८.६%२५.४%९२,३४१,४३६८८.७१%११,७५८,०१६११.२९%१,१०२९१८
४ (रा ४)पश्चिम बंगाल९१,२७६,११५७.५४%१३.८%६२,१८३,११३६८.१३%२९,०९३,००२३१.८७%१,०२९९५३
५ (रा ५)मध्य प्रदेश७२,६२६,८०९६%२०.३%५२,५५७,४०४७२.३७%२०,०६९,४०५२७.६३%२३६९३१
६ (रा ६)तमिळनाडू७२,१४७,०३०५.९६%१५.६%३७,२२९,५९०५१.६%३४,९१७,४४०४८.४%५५५९९६
७ (रा ७)राजस्थान६८,५४८,४३७५.६६%२१.३%५१,५००,३५२७५.१३%१७,०४८,०८५२४.८७%२०१९२८
८ (रा ८)कर्नाटक६१,०९५,२९७५.०५%१५.६%३७,४६९,३३५६१.३३%२३,६२५,९६२३८.६७%३१९९७३
९ (रा ९)गुजरात६०,४३९,६९२४.९९%१९.३%३४,६९४,६०९५७.४%२५,७४५,०८३४२.६%३०८९१९
१० (रा १०)आंध्र प्रदेश४९,५७७,१०३४.१%११.०%३४,९६६,६९३७०.५३%१४,६१०,४१०२९.४७%३०३९९३
११ (रा ११)ओडिशा४१,९७४,२१९३.४७%१४%३४,९७०,५६२८३.३१%७,००३,६५६१६.६९%२६९९७८
१२ (रा १२)तेलंगणा३५,००३,६७४२.८९%१३.५८%२१,३९५,००९६१.१२%१३,६०८,६६५३८.८८%३१२९८८
१३ (रा १३)केरळ३३,४०६,०६१२.७६%४.९%१७,४७१,१३५५२.३%१५,९३४,९२६४७.७%८५९१,०८४
१४ (रा १४)झारखंड३२,९८८,१३४२.७३%२२.४%२५,०५५,०७३७५.९५%७,९३३,०६१२४.०५%४१४९४८
१५ (रा १५)आसाम३१,२०५,५७६२.५८%१७.१%२६,८०७,०३४८५.९%४,३९८,५४२१४.१%३९८९५८
१६ (रा १६)पंजाब२७,७४३,३३८२.२९%१३.८९%१७,३४४,१९२६२.५२%१०,३९९,१४६३७.४८%५५१८९५
१७ (रा १७)छत्तिसगढ२५,५४५,१९८२.११%२२.६%१९,६०७,९६१७६.७६%५,९३७,२३७२३.२४%१८९९९१
१८ (रा १८)हरियाणा२५,३५१,४६२२.०९%१९.९%१६,५०९,३५९६५.१२%८,८४२,१०३३४.८८%५७३८७९
१९ (प्र १)दिल्ली१६,७८७,९४११.३९%२१.२%४१९,०४२२.५%१६,३६८,८९९९७.५%११,२९७८६८
२० (प्र २)जम्मू आणि काश्मीर१२,२६७,०३२१.०१%२३.६%९,०६४,२२०७३.८९%३,२०२,८१२२६.११%२९७८९०
२१ (रा १९)उत्तराखंड१०,०८६,२९२०.८३%१८.८%७,०३६,९५४६९.७७%३,०४९,३३८३०.२३%१८९९६३
२२ (रा २०)हिमाचल प्रदेश६,८६४,६०२०.५७%१२.९%६,१७६,०५०८९.९७%६८८,५५२१०.०३%१२३९७२
२३ (रा २१)त्रिपुरा३,६७३,९१७०.३%१४.८%२,७१२,४६४७३.८३%९६१,४५३२६.१७%३५०९६०
२४ (रा २२)मेघालय२,९६६,८८९०.२५%२७.९%२,३७१,४३९७९.९३%५९५,४५०२०.०७%१३२९८९
२५ (रा २३)मणिपूर२,५७०,३९००.२१%२४.५%१,७९३,८७५६९.७९%७७६,५१५३०.२१%१२२९९२
२६ (रा २४)नागालॅंड१,९७८,५०२०.१६%−०.६%१,४०७,५३६७१.१४%५७०,९६६२८.८६%११९९३१
२७ (रा २५)गोवा१,४५८,५४५०.१२%८.२%५५१,७३१३७.८३%९०६,८१४६२.१७%३९४९७३
२८ (रा २६)अरुणाचल प्रदेश१,३८३,७२७०.११%२६.०%१,०६६,३५८७७.०६%३१७,३६९२२.९४%१७९३८
२९ (प्र ३)पुडुचेरी१,२४७,९५३०.१%२८.१%३९५,२००३१.६७%८५२,७५३६८.३३%२,५९८१,०३७
३० (रा २७)मिझोरम१,०९७,२०६०.०९%२३.५%५२५,४३५४७.८९%५७१,७७१५२.११%५२९७६
३१ (प्र ४)चंदिगढ१,०५५,४५००.०९%१७.२%२८,९९१२.७५%१,०२६,४५९९७.२५%९,२५२८१८
३२ (रा २८)सिक्कीम६१०,५७७०.०५%१२.९%४५६,९९९७४.८५%१५३,५७८२५.१५%८६८९०
३३ (प्र ५)दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव५८५,७६४०.०५%५५.१%२४३,५१०४१.५७%३४२,२५४५८.४३%९७०७११
३४ (प्र ६)अंदमान आणि निकोबार३८०,५८१०.०३%६.९%२३७,०९३६२.३%१४३,४८८३७.७%४६८७६
३५ (प्र ७)लडाख२७४,००००.०२%१७.८%४३,८४०१६%२३०,१६०८४%२.८८५३
३६ (प्र ८)लक्षद्वीप६४,४७३०.०१%६.३%१४,१४१२१.९३%५०,३३२७८.०७%२,०१३९४६
एकूणभारत१,२१०,५६९,५७३१००%१७.७%८३३,४६३,४४८६८.८४%३७७,१०६,१२५३१.१६%३८२९४३

संदर्भ

[संपादन]
  1. "Census and you - Area And Population". 2007-12-26. 26 December 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-08 रोजी पाहिले.
  2. "Census Organisation of India". Government of India (2001). Census of India. December 1, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-04 रोजी पाहिले.
  3. "Brief history of census". Government of India (2001). Census of India. 2013-11-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-10-26 रोजी पाहिले.
  4. 1 2 "Archived copy" (PDF). द हिंदू. 2013-11-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.CS1 maint: archived copy as title (link)
  5. Shinde, Swati (13 Sep 2008). "Migration rate to city will dip". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-12-08 रोजी पाहिले.
  6. "Develop towns to stop migration to urban areas: economist". द हिंदू. Chennai, India. Dec 3, 2005. December 5, 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-08 रोजी पाहिले.
  7. "Migration". Government of India (2001). Census of India. 2013-11-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-10-26 रोजी पाहिले.
  8. "List of states with Population, Sex Ratio and Literacy Census 2011". www.census2011.co.in. 2023-04-30 रोजी पाहिले.
  9. "Census 2011: Population in States and Union Territories of India". Jagranjosh.com. 2016-10-14. 2023-04-30 रोजी पाहिले.
इतर माहिती

भारत जनगणना २००१ Archived 2005-11-23 at the वेबॅक मशीन.