मनोहर पर्रीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मनोहर पर्रीकर
मनोहर पर्रीकर


कार्यकाळ
९ नोव्हेंबर २०१४ – १३ मार्च २०१७
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील अरुण जेटली
पुढील निर्मला सीतारमण

कार्यकाळ
१४ मार्च २०१७ – १७ मार्च २०१९
मागील लक्ष्मीकांत पार्सेकर
पुढील डॉ. प्रमोद सावंत
मतदारसंघ पणजी
कार्यकाळ
२ मार्च २०१२ – ८ नोव्हेंबर २०१४
मागील दिगंबर कामत
पुढील लक्ष्मीकांत पार्सेकर
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर इ.स. २००० – २ फेब्रुवारी इ.स. २००५
मागील फ्रान्सिस्को सार्डिन्हा
पुढील प्रतापसिंह राणे

जन्म १३ डिसेंबर, १९५५ (1955-12-13) (वय: ६४)
म्हापसा, गोवा
मृत्यू १७ मार्च, २०१९ (वय ६३)[१]
गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (जन्म : १३ डिसेंबर १९५५; मृत्यू : १७ मार्च २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते. पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते.

त्यांचा जन्म म्हापसा(गोवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटी ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आयआयटीतील वर्गमित्र आहेत.

पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मृत्यू[संपादन]

१७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर निधन पावले.[२]

पर्रीकरांसंबंधी पुस्तके[संपादन]

  • गोवा राजकारण आणि पर्रीकर (सद्गुरू पाटील)

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]