"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
कृष्ण [[यदु वंश|यादव कुळात]] जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. [[सुभद्रा]] आणि [[द्रौपदी]] या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली [[बहीण]] होती. [[बलराम]] त्याचा भाऊ आहे. रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा अशा श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या. |
कृष्ण [[यदु वंश|यादव कुळात]] जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. [[सुभद्रा]] आणि [[द्रौपदी]] या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली [[बहीण]] होती. [[बलराम]] त्याचा भाऊ आहे. रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा अशा श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या. |
||
==राधा== |
|||
[[ब्रह्मवैवर्तपुराण]] या ग्रंथात [[राधा]] ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे [[सांख्यशास्त्र|सांख्यशास्त्रातील]] [[प्रकृती]] व [[पुरुष]] होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही |
[[ब्रह्मवैवर्तपुराण]] या ग्रंथात [[राधा]] ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे [[सांख्यशास्त्र|सांख्यशास्त्रातील]] [[प्रकृती]] व [[पुरुष]] होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय. |
||
==कृष्णाची मुले (एकूण ८०)== |
|||
* श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु. |
|||
* श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु |
|||
* श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु |
|||
* श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती |
|||
* श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक |
|||
* श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०) : प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित |
|||
* श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि |
|||
* श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०) : संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक. |
|||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
२३:५०, २९ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.
श्रीकृष्ण जन्म
कृष्णाचा जन्म गोकुळ अष्टमीच्या आधल्या दिवशी मध्यरात्रीला झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
इतिहास
कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपास झाला असावा.
कुटुंब
कृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. बलराम त्याचा भाऊ आहे. रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा अशा श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या.
राधा
ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय.
कृष्णाची मुले (एकूण ८०)
- श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.
- श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु
- श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु
- श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती
- श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक
- श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०) : प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित
- श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि
- श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०) : संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.
शिक्षण
श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.
कार्य
कालिया नागाला त्याने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशेआठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
गीता
महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न, कष्ट, काम म्हणजेच कर्म केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी कर्म केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.
निर्वाण
महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू ५५२५ या वर्षी झाला.
इतर कृष्ण
कृष्ण हें ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सूक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषीचें नांवही होतें. त्यानुसार इतिहास काळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे.
पुस्तके
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
- कृष्ण सखा माझा भाग १, २, ३ (परमानंदस्वामी) : हे पुस्तक ई-साहित्यवर उपलब्ध आहे.
- युगंधर (शिवाजी सावंत)
- योगेश्वर श्रीकृष्ण (डॉ. सुमती क्षेत्रमाडे)
- श्रीकृष्णदर्शन (मंगला कुलकर्णी)
- श्रीकृष्णलीला (मंगला कुलकर्णी)
बाह्य दुवे
- राधावल्लभ.कॉम (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |