वराह अवतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वराह अवतार
Varaha avtar, killing a demon to protect Bhu, c1740.jpg
इ.स. १७४० मधील चंबा सहलीतील वराहाचे चित्र
मराठी वराह अवतार
संस्कृत वराहावतारः
कन्नड ವರಾಹಾವತಾರ
तमिळ வராஹ அவதாரம்
शस्त्र शंख,चक्र, गदा, कमळ
पत्नी भूमी देवी पृथ्वी (माता)
या देवतेचे अवतार मत्स्य, कूर्म, नृसिंह, परशुराम, वामन, राम, कृष्ण, बुद्ध, इत्यादी
या अवताराची मुख्य देवता विष्णू
नामोल्लेख वराह पुराण
पितळी रथावरील वराह अवताराची प्रतिमा, सियरसोल राजबाड़ी, पश्चिम बंगाल, भारत

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.

ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.

वराह पुराणातील आख्यायिका[संपादन]

वराह पुराणात वराह अवताराच्या संबंधित पुढीलप्रमाणे तीन प्रकारच्या आख्यायिका आहेत. मुळात हे तीन वराह होते. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराहकाळ म्हणतात.

१.. नील वराह काल : नील वराहाचा हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता. तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रहायला जागाच शिल्लक नव्हती.

पाद्मकल्पाच्या शेवटी महाप्रलय झाला. सूर्याच्या भयंकर तापामुळे धरतीवरील सर्व वने सुकली. समुद्राचे पाणीपण आटले. ज्वालामुखी जागृत झाले. अतीव उष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याचे ढग झाले आणि न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला. त्यातच वादळे झाली आणि बघताबघता सर्व पृथ्वी जलमय झाली.

हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली. त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या वि़ष्णूला अवतार घेण्यास सांगितले. आणि मग विष्णूने नील वराहाच्या रूपात प्रकट होऊन पृुथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला.

पुराणकार म्हणतात की या काळात नील वराह आपली पत्नी नयनादेवीच्या बरोबर संपूर्ण डुक्करसेना घेऊन आला होता. त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी लत्ताप्रहारांनी, दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवले. त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले.

त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वने, पुष्करिणी व सरोवर निर्माण झाले. लतावृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झाले. बहुधा ह्याच काळात नील वराहाने मधु आण कैकट या असुरांचा वध केला.

२. आदि वराह काल : नील वराह कल्पानंतर आदि वराह (कपिल वराह) कल्प सुरू झाला. या काळात दिती (पत्नी) आणि कश्यप (पती) यांचे पुत्र हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष यांची दहशत होती. दोघांनाही ब्रह्मदेवाचे अमरत्वाचे आणि अजिंक्य राहण्याचे वर मिळालेले होते. हा काळ हिमयुग समाप्तीनंतरचा समजला जातो.

कश्यपाचे क्षेत्र कॅस्पियन समुद्रापासून ते काश्मीरपर्यंत होते. संशोधकांच्या मते ह्या काळात हिरण्याक्ष हा दक्षिण हिंदुस्थानात राज्य करीत होता. तो वराह नावाच्या आदिवासी जमातीत जन्म घेतलेल्या श्रीवि़ष्णूच्या मागे लागला होता. नील वराहाने केलेल्या पृथ्वीच्या उत्थानाची ती खिल्ली उडवत असे. त्याने वि़ष्णूला युद्धाचे आव्हान दिले.

आदि वराहाच्या बरोबर प्रचंड सेना होती. त्याने आपली सेना घेऊन हिरण्याक्षाच्या राज्यावर हल्ला केला. अणि विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेले विशाल जलक्षेत्र (समुद्र) ओलांडून त्याने हिरण्याक्षाच्या नगराला वेढा दिला. आजच्या महाराष्ट्रातील संगमनेर येथे घनघोर लढाई झाली. हिरण्याक्षाला आपल्या शक्तीचा गर्व होता. तो आधी स्वर्गात भटकाययचा. त्याचा विशाल देह आणि विशाल गदा पाहून कोणीही त्याच्याशी युद्ध करायची हिंमत करत नव्हता. युद्धाच्या भरात तो समुद्रात शिरला. त्यावेळी वराहरूपी विष्णूने आपल्या सुळ्याच्या टोकावर पृथ्वी वर उचलली. हिरण्याक्षाने त्याला जंगली जंगली म्हणत पृथ्वीला खाली ठेवण्यास सांगितले. पृथ्वीशी वैर असलेल्या हिरण्याक्षाने वराहाशी गदायुद्ध सुरू केले. त्याच्या मायावी शक्ती नष्ट करून शेवटी श्रीविष्णूने अंती हिरण्याक्षाचा अंत केला. आजही दक्षिणी भारतात हिरण्याक्षाच्या राज्याचा भाग असलेली हिंगोली, हिंगणघाट, हिंगना नदी हे स्थळे आणि हिरण्याक्षगणाची हेगडे नावाची माणसे आहेत.