कल्की अवतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कल्की अवतार
Kalki Avatar by Ravi Varma.jpg
कल्कीनारायण

जग विश्वाचे तारणहार - इत्यादींची अधिपती देवता

मराठी कल्कि
संस्कृत कल्किः
निवासस्थान शम्भल ,पृथ्वी
लोक वैकुंठ शम्भल ,पृथ्वी
वाहन अश्व
शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख , अग्नि तलवार
वडील विष्णुयश
आई सुमति
पत्नी लक्ष्मी पद्मा
अन्य नावे/ नामांतरे कल्किन

केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ.

या देवतेचे अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध,
या अवताराची मुख्य देवता नारायण माधव
नामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णु पुराण कल्कि पुराण

दशावतार

कल्की अवतार (संस्कृत: कल्कि अवतार) हा भविष्यात येणारा श्रीविष्णूचा अंतिम अवतार मानला जातो.विष्णूचा दहावा अवताराला कल्की महाअवतार असे म्हणतात कल्की अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकाल मध्ये होईल[१];पुराणनुसार कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल.कल्की अवतार तेजस्वी तलवारीसह एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावरस्वार होऊन कलियुगात भगवान कल्की सर्व पापी अधर्म दुष्ट राजांचा नाश करेल. [२] अशांत जगाला शांती देईल. कलियुगा.कलि राक्षसाचा विनाश करेल.[३] सर्वप्रथम महाप्रलय [४]येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरु होईल [५], वैष्णव सिद्धांतनुसार हिंदू धर्मातील कालगणनेनुसार म्हणजेच अंतहीन चक्रात चार युगापैकी एक युग म्हणजे कलियुग आहे [६]

कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.[७]

कल्की पुराणानुसार बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नि कौमुडी यांची कन्या पद्मावती (लक्ष्मी) आहे.[८]

ब्रह्मवैवर्तपुराण २.७व्युत्पत्तिशास्त्र[संपादन]

कल्कि हे नाव (अनंतकाळ) आधारित आहे, ज्याचा अर्थ "वेळ" (कलियुग) आहे. कल्कीचा शाब्दिक अर्थ "सशक्त आवाज" आहे. महाभारत हस्तलिखिते (उदा. G3.6 हस्तलिखित) सापडली आहेत, जिथे संस्कृत श्लोकांमध्ये "कल्की" ऐवजी अवताराचे नाव "कार्की" असे आहे.[९] कल्की , ज्याला कल्किन किंवा कार्की देखील म्हटले जाते ,

"कल्की" संस्कृतमध्ये कमळांचे फूल जसे " चिखलामधुन-उत्पत्ति " असेही वर्णन केले आहे . आपल्या सर्वांना माहित आहे की कमळ एक आहे विष्णूचे प्रमुख प्रतीक आहे[१०]

दुसरे अर्थ अंधाराचा नाश, कल्मषनाशक[११](पापनष्ट ) घाण विनाश करणारा, कल्की (संस्कृत कलकी, संस्कृत ; कल्किन् पासून ) ज्याचा अर्थ दु: ख व अंधाराचा नाश करणारा' किंवा 'अज्ञानाचा नाश करणारा' . संस्कृतमधील आणखी एक व्युत्पत्तिशास्त्र म्हणजे 'पांढरा घोडा'.[१२]

कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश करणारा')


धर्माग्रंथामध्ये वर्णन[संपादन]

हिंदू धर्मात कलियुगाच्या अंत[संपादन]

हिन्दुधर्मानुसार कलियुगाचा काळ शेवट असून पापांचा आणि अधर्माचा नाश करत देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कल्की येईल.कलियुगात भगवान कल्की पुन्हा सतयुगाची स्थापना करेल. [१३]

वेद्व्यासपुत्र शुकदेव यांनी राजा परीक्षितला कलियुगाच्या समाप्तीचे वर्णन सांगितलेले भागवत व भविष्यपुराणात सापडते.[१४] [१५]

 1. कलियुगाच्या समाप्तीपूर्वी लोक फक्त मासे खाऊन बकरीचे दूध पीऊन जगतील कारण पृथ्वीवर एकही गाय राहणार नाही.हवामानाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. अति थंड, उष्णता आणि बर्फ तापमान खराब होण्यास कारणीभूत ठरेल. यामुळे, मानवी जीवन तहान, भूक आणि रोगांनी ग्रस्त असेल. कलियुगात, एखाद्या व्यक्तीचे वय केवळ ५० वर्षे असेल आणि ते आपल्या वृद्धांना संरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची काळजी घेऊ शकणार नाहीत.पृथ्वीवर कोणतीही व्यक्तीला वैदिक आणि धार्मिक कार्यात छंद नाही[१६]
 2. कलियुगाच्या शेवटी, फक्त तीव्र वादळ व भूकंप होतील. लोक घरात राहणार नाहीत. लोक खड्डा खणतील. पृथ्वीचे तीन फूट म्हणजेच सुमारे साडेचार फूट पृथ्वीवरील सुपीक भाग नष्ट होईल.[१७]
 3. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात अशीही वेळ येईल जेव्हा मनुष्याचे वय खूपच कमी असेल, युवावस्था संपेल. कलीच्या प्रभावामुळे, प्राण्यांचे शरीर लहान, क्षीण आणि आजार होण्यास सुरवात होईल.[१८],
 4. पद्म पुराणात (६.७१.२७९.२८२) असे म्हटले आहे की भगवान कल्कि कलीचे युग संपवतील आणि सर्व दुष्ट म्लेच्छाचा[१९]विनाश करतील आणि अशा प्रकारे जगाची वाईट स्थिती नष्ट करतील. कलियुगात कल्कि नारायण हातात तलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल.कलिचा (राक्षसाचा) विनाश करुन सत्ययुग (सतयुग) सुरुवात होईल.[२०]
 5. गरुड, भागवत, विष्णु पुराणात दहा अवतारांची यादी आहे. त्यांत कल्की दहाव्या क्रमांकावर आहे. कलियुगच्या शेवटी दिसणारा अवतार म्हणून त्याचे वर्णन केले आहे.[२१]


दाक्ष्यं कुटुंबभरणं यशोऽर्थे धर्मसेवनम् ।

एवं प्रजाभिर्दुष्टाभिः आकीर्णे क्षितिमण्डले ॥ ७ ॥

ब्रह्मविट्क्षत्रशूद्राणां यो बली भविता नृपः ।

प्रजा हि लुब्धै राजन्यैः निर्घृणैः दस्युधर्मभिः ॥ ८ ॥

आच्छिन्नदारद्रविणा यास्यन्ति गिरिकाननम् ।

शाकमूलामिषक्षौद्र फलपुष्पाष्टिभोजनाः ॥ ९ ॥


अर्थ - कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दर्‍यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील. (७-९)
शीख धर्मग्रंथात श्रीदशमग्रंथांमध्ये [२२][संपादन]

सिख धर्म-गुरु गोबिंद सिंह यांनी श्रीदशमग्रंथांमध्ये लिहिले की देव भविष्यात Nihakalanki (निहाकलंकी) अवतार असेल.

अन्य धर्मात [२३][२४][संपादन]

हज़रत इमाम महदी;- अहमदिया (Ahmadiyya) हा एक इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय आहे.- अहमदिया मुसलमान लोक हज़रत इमाम महदीला भविष्यात येणारा ईश्वर मानतात,

इमाम महदी असुर दज्जालचा विनाश करेल असे अहमदिया मुसलमान सांगतात [२५][२६][२७]

येशु मसीह- बायबल ख्रिश्चन धर्मग्रंथामध्ये प्रकटीकरण १९:११-१६ मध्ये ( ख्रिस्त ऑन व्हाईट हॉर्स ; Christ on a White Horse) असे वर्णन केले[२८] येशु मसीह ख्रिस्तविरोधी सैतानाचा[२९] (ल्यूसिफर Lucifer

) विनाश करेल.

मैत्रेय[३०] - बुद्ध बौद्ध ग्रंथातही कल्किन चक्रीन [३१] असे नाव आढळते. तिब्बती बौद्ध धर्मात, कालचक्र-तंत्रात[३२] २५ राज्यकर्ते स्वर्गीय शंभल कडून असे वर्णन केले[३३]


कल्कि पत्नि पद्मा[संपादन]

 • इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति

बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा

भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -कल्कि पुराण:२.६

कल्कि पुराणानुसार, ती माझी प्रिया लक्ष्मी (सिंहले) नामात बेटाचा प्रदेशात जन्म होईल. सिंहल या बेटाचा बृहद्रथराजा आणि त्यांची पत्नि रानी कौमुडी यांची कमळासारखी सामान डोळे असणारी कन्यादेवी लक्ष्मी आहे .माझी पत्नि पद्मा नावाने ओळखतील.


श्रीमद्भागवतपुराणम् /स्कन्धः १२/ अध्यायः२[३४][३५][संपादन]

इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥

मराठीत अर्थ:- अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वत: सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील.

चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः । धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥

मराठीत अर्थ:-"सर्वशक्तिमान भगवान विष्णू सर्वव्यापी . सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात.

संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः । भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति ॥ १८ ॥

मराठीत अर्थ:-विष्णु कल्कि हा शम्भल नावाच्या गावात विष्णुयश नावाच्या मुख्य महात्मा ब्राह्मणाच्या घरात पत्नी सुमतीच्या गर्भात भविष्यात जन्म घेईल.

अश्वं आशुगमारुह्य देवदत्तं जगत्पतिः । असिनासाधुदमनं अष्टैश्वर्य गुणान्वितः ॥ १९ ॥

मराठीत अर्थ:- अष्टमहासिद्धींना संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय, चराचर जगताचे स्वामी भगवान, देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा विनाश करतील.

विचरन् आशुना क्षौण्यां हयेनाप्रतिमद्युतिः । नृपलिङ्‌गच्छदो दस्यून् कोटिशो निहनिष्यति ॥ २० ॥

मराठीत अर्थ:- अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवरून संचार करतील आणि राजे म्हणवणार्‍या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील.

अथ तेषां भविष्यन्ति मनांसि विशदानि वै । वासुदेवाङ्‌गरागाति पुण्यगंधानिलस्पृशाम् ।पौरजानपदानां वै हतेष्वखिलदस्युषु ॥ २१ ॥

मराठीत अर्थ:-जेव्हा सर्व दुष्टा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील

तेषां प्रजाविसर्गश्च स्थविष्ठः संभविष्यति । वासुदेवे भगवति सत्त्वमूर्तौ हृदि स्थिते ॥ २२ ॥

मराठीत अर्थ:-त्यांच्या हॄदयामध्ये सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची जनसमूह बलवान होऊ लागेल.

यदावतीर्णो भगवान् कल्किर्धर्मपतिर्हरिः । कृतं भविष्यति तदा प्रजासूतिश्च सात्त्विकी ॥ २३ ॥

मराठीत अर्थ:-धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी जनसमूह सात्विक होईल.

यदा चन्द्रश्च सूर्यश्च तथा तिष्यबृहस्पती । एकराशौ समेष्यन्ति भविष्यति तदा कृतम् ॥ २४ ॥

मराठीत अर्थ:- बृहस्पतीच्या तिष्य (पुष्य ) नक्षत्रात चंद्र, सूर्य आणि बृहस्पति एकाच नक्षत्रावर समान अंशात येतील,तेव्हा भविष्यात सत्ययुग सुरू होईल.

जन्म[संपादन]

 • द्वादश्यां शुक्ल-पक्षस्य माधवे मासि माधवम्

जातं ददृशतुः पुत्रं पितरौ हृष्ट-मानसौ - कल्कि पुराण: २.१५[३६]

सिद्धांत[संपादन]

काही लोकांच्या मते हा अवतार पृथ्वीवर आला आहे.कल्कि अवतारच्या या पोस्टमध्ये अनेक स्वयंसेवी दावेदार आहेत, ज्यांना वेळोवेळी, भविष्यवाणीनुसार आणि स्वत: (लोक) कल्की संबंधित पुरावे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असलेल्या कल्कि अवतारच्या संदर्भात अनेक भविष्यवाण्यांविषयी (google.com, youtube.com इत्यादी) .(KALKI AVATAR) मध्ये शोधून पाहिले जाऊ शकते

काही जण शम्भलला चीनच्या गोबी वाळवंटात मानतात, जेथे मानव पोहोचू शकत नाहीत. काही वृंदावनमध्ये विश्वास करतात.

 • शम्भल [३७]तिबेटी बौद्ध परंपरेत, शम्भल (संस्कृत : शम्भलः ; तिब्बती भाषा : བདེ་འབྱུང, Wylie: bde 'byung; चीनी भाषा : 香巴拉; फिनयीन : xiāngbālā) हे एक पौराणिक शहर आहे.

हे शहर ८४ कमलदलानी जे कमळासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ यादी[संपादन]

 1. ^ जोशी, अनिरुद्ध. "kalki avatar hindi | कब होगा भगवान विष्णु का कल्कि अवतार?". hindi.webdunia.com (hi मजकूर). 2019-09-12 रोजी पाहिले. 
 2. ^ AnonAF (2012-09-02). "Kalki: The Next Avatar of God and the End of Kali-Yuga". Open Revolt! (en मजकूर). 2019-09-12 रोजी पाहिले. 
 3. ^ says, Renu. "The Next Incarnation of God -" (en-US मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 4. ^ "कलियुग के अंत में कुछ इस तरह होगा प्रलय!". कुछ नया (en-US मजकूर). 2019-08-02. 2019-09-14 रोजी पाहिले. 
 5. ^ "जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV". Dailyhunt (en मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 6. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-09-04. 
 7. ^ "जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV". Dailyhunt (en मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 8. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-09-04. 
 9. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-08-16. 
 10. ^ Ashokkoul (2018-04-18). "THE BITTER TRUTH: Kalki". THE BITTER TRUTH. 2019-08-31 रोजी पाहिले. 
 11. ^ "कल्मष - विक्षनरी". hi.wiktionary.org. 2019-08-21 रोजी पाहिले. 
 12. ^ www.wisdomlib.org (2009-04-11). "Kalki, Kalkī: 11 definitions". www.wisdomlib.org. 2019-08-31 रोजी पाहिले. 
 13. ^ "कलियुग के अंत में कुछ इस तरह होगा प्रलय!". कुछ नया (en-US मजकूर). 2019-08-02. 2019-09-14 रोजी पाहिले. 
 14. ^ "शुकदेव". विकिपीडिया (hi मजकूर). 2019-06-03. 
 15. ^ "शुकदेव - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org. 2019-09-14 रोजी पाहिले. 
 16. ^ "भगवत पुराण के अनुसार कलयुग और कल्कि से जुड़ी भविष्यवाणियां । bhagwat puran predictions related to kalyu". hindi.speakingtree.in (hi मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 17. ^ "जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV". Dailyhunt (en मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 18. ^ Webdunia. "क्या होगा कलियुग के अंत में, जानिए...". hindi.webdunia.com (hi मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 19. ^ "Mleccha". Wikipedia (en मजकूर). 2019-08-02. 
 20. ^ says, Renu. "The Next Incarnation of God -" (en-US मजकूर). 2019-09-10 रोजी पाहिले. 
 21. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-09-04. 
 22. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-09-04. 
 23. ^ "Imam Mahdi". adishakti.org. 2019-09-14 रोजी पाहिले. 
 24. ^ Perry, Schmidt-Leukel (2017-02-16). Religious Pluralism and Interreligious Theology: The Gifford Lectures--An Extended Edition (en मजकूर). Orbis Books. आय.एस.बी.एन. 9781608336951. 
 25. ^ Hussain, Md Adil (2018-07-01). "शुबहात और दज्जाल". The Muslim Skeptic (en-US मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 26. ^ "AhmadiAnswers | Dajjal And Gog And Magog" (en-US मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 27. ^ Farhan. "Ahmadiyya". Ahmadiyya (en-US मजकूर). 2019-09-14 रोजी पाहिले. 
 28. ^ "Revelation 19:11-16 NKJV;ERV-MR - Christ on a White Horse - Now I saw - Bible Gateway". www.biblegateway.com. 2018-11-20 रोजी पाहिले. 
 29. ^ "सैतान चे चेहरे. देव दुष्टांना परवानगी देतो का? सैतान कुठून आला". daybuk.ru. 2019-09-14 रोजी पाहिले. 
 30. ^ "मैत्रेय बुद्ध". विकिपीडिया (hi मजकूर). 2018-11-16. 
 31. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-09-04. 
 32. ^ Jr, Donald S. Lopez (2015-11-24). Buddhism in Practice: Abridged Edition (en मजकूर). Princeton University Press. आय.एस.बी.एन. 9781400880072. 
 33. ^ "Kalki". Wikipedia (en मजकूर). 2019-09-04. 
 34. ^ "श्रीमद्भागवतपुराणम्/स्कन्धः १२/अध्यायः २ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-08-28 रोजी पाहिले. 
 35. ^ "श्रीमद् भागवत पुराण - स्कन्द बारावा - द्वितीयोऽध्यायः". satsangdhara.net. 2019-08-28 रोजी पाहिले. 
 36. ^ "Kalki - Silambam Asia". silambam.asia (en-US मजकूर). 2019-09-10 रोजी पाहिले. 
 37. ^ "शम्भल". विकिपीडिया (hi मजकूर). 2018-10-14. 

[१][२]

 1. ^ "THE COMING OF NIKALANK AVATAR: A MESSIANIC THEME IN SOME SECTARIAN TRADITIONS OF NORTH-WESTERN INDIA". www.ismaili.net. 2018-11-20 रोजी पाहिले. 
 2. ^ "Kalki Avatar | Kalki Maha Avatar | Meditation Center". Kalki Avatar | Kalki Maha Avatar | Meditation Center. 2018-11-20 रोजी पाहिले.