कूर्म अवतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कूर्म अवतार
Kurma deva.jpg
कूर्मावताराचे चित्र
मराठी कूर्म अवतार
संस्कृत कूर्मावतारः
कन्नड ಕೂರ್ಮಾವತಾರ
तमिळ கூர்ம_அவதாரம்
या अवताराची मुख्य देवता विष्णु

कूर्म अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो.

देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर या समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णुनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्र मंथन करू लागले. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने प्राप्त झाली.