पेकिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बीजिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
बीजिंग
北京市
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

Beijing montage.png
वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : थ्यॅनान्मन, थ्यॅन थान - अर्थात स्वर्गमंदिर, राष्ट्रीय ललित कला केंद्र, बीजिंग नॅशनल स्टेडियम
China Beijing.svg
बीजिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 39°54′50″N 116°23′30″E / 39.91389°N 116.39167°E / 39.91389; 116.39167

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४७३
महापौर ग्वाओ जिन्लाँग
क्षेत्रफळ १६,८०१ चौ. किमी (६,४८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४३ फूट (४४ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०६,९३,०००
  - घनता १,२०० /चौ. किमी (३,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.beijing.gov.cn/


बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, (लेखनभेद: पेइचिंग, पेकिंग, बैजिंग; चिनी: 北京市 ; फीनयीन: Běijīng ;) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग षांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते.

बीजिंग चीनचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून येथे सिनोपेक, चायना नॅशनल पेट्रोलियम, चायना मोबाईल इत्यादी बहुसंख्य सरकारी कंपन्यांची मुख्यालये स्थित आहेत. चीनमधील बहुतेक सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग, द्रुतगती रेल्वेमार्ग बीजिंगमधून जातात. प्रवाशांच्या संख्येनुसार येथील बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

बीजिंगला अनेक सहस्रकांचा इतिहास असून गेल्या सात शतकांहून अधिक काळ हे चीनचे राजकीय केंद्र राहिले आहे. बलबाहूने बीजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले. बीजिंग परिसरामध्ये प्रतिबंधित शहर, उन्हाळी राजवाडा, मिंग राजवंशाची थडगी इत्यादी अनेक युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने आहेत. चीनच्या भिंतीचा काही भाग बीजिंगामधून जातो. इ.स १४२० मध्ये बीजिंग शहर मिंग साम्राज्याची अधिकृत राजधानी म्हणून जाहीर झाले.

बीजिंगमध्ये आजवर इ.स. २००८च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा, इ.स. १९९०च्या आशियाई क्रीडास्पर्धा, तसेच इतर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: