फूच्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फूच्यान
福建省
चीनचा प्रांत

फूच्यानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
फूच्यानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी फूचौ
क्षेत्रफळ १,२१,४०० चौ. किमी (४६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,१५,४०,०८६
घनता २९१ /चौ. किमी (७५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-FJ
संकेतस्थळ http://www.fujian.gov.cn/

फूच्यान (देवनागरी लेखनभेद: फूज्यान; चिनी: 福建省 ; फीनयीन: Fújiàn ;) हा चीन देशाच्या आग्नेय किनाऱ्यावरील प्रांत आहे. फूच्यान प्रांताच्या उत्तरेस च-च्यांग, पश्चिमेस च्यांग्शी, दक्षिणेस क्वांगतोंग हे प्रांत आहेत. याच्या पूर्वेस ताइवान सामुद्रधुनी असून त्यापलीकडे ताइवान बेट आहे. हान चिनी वंशीयांचे बाहुल्य असलेला हा प्रांत चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकातील सर्वाधिक भाषिक व सांस्कृतिक वैविध्य असलेला प्रांत आहे. २०२० साली फूच्यान प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.१५ कोटी इतकी होती. फूचौ ही फूच्यानची राजधानी व सर्वात मोठे शहर असून च्यामेन, क्वानचौ ही इतर मोठी शहरे आहेत.

फूच्यानाचा बहुतेक भाग चीनच्या जनता-प्रजासत्ताकाशी संलग्न असला, तरीही किन्मनमात्सू हे द्वीपसमूह चीनच्या प्रजासत्ताकाशी (ताइवानाशी) संलग्न आहेत. थोडक्यात भूराजकीयदृष्ट्या 'ची.ज.प्र. फूच्यान' व 'ची.प्र. फूच्यान' असे दोन भिन्न प्रांत आहेत.


राजकीय विभाग[संपादन]

फूच्यान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

फूच्यानचे राजकीय विभाग
ह्या भूभागांवर चीन देशाचे अधिपत्य असले तरीही तैवानने येथे हक्क सांगितला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत