कान्सू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कान्सू
甘肃省
चीनचा प्रांत

कान्सूचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
कान्सूचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी लांचौ
क्षेत्रफळ ४,२५,८०० चौ. किमी (१,६४,४०० चौ. मैल)
लोकसंख्या २,५५,७५,२५४
घनता ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-GS
संकेतस्थळ http://www.gansu.gov.cn/

कान्सू (देवनागरी लेखनभेद: गान्सू ; सोपी चिनी लिपी: 甘肃; पारंपरिक चिनी लिपी: 甘肅; फीन्यिन: Gānsù; ) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे. हा प्रांत तिबेटाचे पठारह्वांगथू पठार यांच्या मधोमध वसला आहे. याच्या उत्तरेस मंगोलियाची आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच आंतरिक मंगोलियानिंग्श्या, पश्चिमेस शिंच्यांगछिंघाय, दक्षिणेस सिच्वान, पूर्वेस षा'न्शी या चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. कान्सूच्या दक्षिणेकडील भागातून पीत नदी वाहते. लांचौ येथे या प्रांताची राजधानी आहे.

सुमारे २.६ कोटी लोकसंख्या (इ.स. २००९) असलेल्या कान्सूत ह्वी वांशिकांचे लक्षणीय अस्तित्व आहे. प्रांताच्या नैऋत्येकडील भागांत तिबेटी लोकही वसले आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ९१ % प्रजा हान वंशीय असून, ५ % प्रजा ह्वी वंशीय, तर २ % प्रजा तिबेटी वंशीय आहे.

भूगोल[संपादन]

४,२५,८०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा कान्सू प्रांत तिबेटाचे पठार आणि ह्वांगथू पठार यांच्यादरम्यान वसला आहे. प्रांताची बहुशः जमीन समुद्रसपाटीपासून १,००० कि.मी. उंचीवर पसरली आहे. उत्तर कान्सूचा बराचसा भूप्रदेश समतल आहे. गोबी वाळवंटाचा काही भाग प्रांताच्या उत्तर भागातच मोडतो. प्रांताच्या दक्षिणेकडील भूप्रदेश डोंगराळ असून छिल्यान पर्वताच्या रांगांनी हा भाग व्यापला आहे. चिनाच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली पीत नदी दक्षिण कान्सूतून वाहते, तसेच तिला तिचे बरेचसे पाणी या भागातल्या जलस्रोतांमधूनच लाभते. प्रांताची राजधानी असलेले लांचौ शहर पीत नदीच्याच तीरावर वसले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत