द्रुतगती रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

द्रुतगती रेल्वे (इंग्लिश: High-speed rail) हा रेल्वे वाहतूकीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये रेल्वेगाडीचा वेग पारंपारिक गाड्यांपेक्षा अधिक असतो. द्रुतगती रेल्वेसाठी वेगळे लोहमार्ग बांधले जातात तसेच विशिष्ठ प्रकारची इंजिने, डबे इत्यादी वापरले जातात. जगातील सर्वप्रथम द्रुतगती रेल्वे १९६४ साली जपानमधील तोक्योओसाका ह्या शहरांदरम्यान सुरू झाली. सध्या फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इटली, चीन, तैवान, दक्षिण कोरिया इत्यादी अनेक देशांमध्ये द्रुतगती रेल्वे कार्यरत आहे. २०१२ सालापर्यंत द्रुतगती रेल्वेचा कमाल वेग ३०० किमी प्रति तास (१९० मैल/तास) इतका नोंदवला गेला आहे. फ्रान्समधील टीजीव्ही, जर्मनीमधील इंटरसिटी एक्सप्रेस, जपानमधील शिंकान्सेन ह्या काही जगामधील प्रसिद्ध द्रुतगती रेल्वे आहेत.

भारत देशामध्ये सध्या द्रुतगती रेल्वे कार्यरत नसली तरीही भारत सरकारने द्रुतगती रेल्वेमध्ये स्वारस्य दाखवले आहे. २०१२ साली ह्याची चाचपणी व प्राथमिक पाहणी करण्यासाठी भारतीय हाय स्पीड रेल निगम नावाच्या कंपनीची निर्मिती करण्यात आली. ह्या संस्थेमार्फत मुंबई-अहमदाबाद व इतर काही शहरांदरम्यान द्रुतगती रेल्वे चालू करण्याबद्दल अभ्यास करण्यात येईल.

देशानुसार कार्यरत द्रुतगती रेल्वेमार्गांची लांबी[संपादन]

देश प्रदेश कार्यरत
(किमी)
काम चालू
(किमी)
एकूण
(किमी)
विद्युतीकरण
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया युरोप 93 0 93 15 kV 16,7 Hz
बेल्जियम ध्वज बेल्जियम युरोप 209 0 209 3 kV DC,
25 kV 50 Hz
Flag of the People's Republic of China चीन आशिया 10,463 13,053 20,318 25 kV 50 Hz
फ्रान्स ध्वज फ्रान्स युरोप 2,036 757 2,793 25 kV 50 Hz
जर्मनी ध्वज जर्मनी युरोप 1,334 428 1,762 15 kV 16.7 Hz
इटली ध्वज इटली [१][२] युरोप 1,342 92 1,434 25 kV 50 Hz, 3 kV DC
जपान ध्वज जपान आशिया 2,664 782 3,446 25 kV 50/60 Hz
Flag of the Netherlands नेदरलँड्स युरोप 120 0 120 25 kV 50 Hz
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया आशिया 0 550 550 25 kV 50 Hz
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया आशिया 412 302 714 25 kV 60 Hz
स्पेन ध्वज स्पेन युरोप 3,100 1,800 4,900 25 kV 50 Hz
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड युरोप 35 72 107 15 kV 16.7 Hz
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान युरोप व आशिया 444 1,506 1,950 25 kV 50 Hz
Flag of the Republic of China तैवान आशिया 345 0 345 25 kV 60 Hz
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम युरोप 113 0 113 25 kV 50 Hz

संदर्भ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: