सायबेरियन रेल्वे
Jump to navigation
Jump to search
सायबेरियन रेल्वे (रशियन: Транссибирская магистраль) हा रशिया देशामधील पूर्व-पश्चिम धावणारा व सायबेरिया प्रदेशाला युरोपियन रशियासोबत जोडणारा एक मोठा रेल्वेमार्ग आहे. राजधानी मॉस्कोपासून ह्या मार्गाची सुरुवात होते. ९,२८८ किमी धावणाऱ्या ह्या रेल्वेमार्गाचे दुसरे टोक रशियाच्या अतिपूर्वेकडील व्लाडिव्होस्टॉक ह्या शहरात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ह्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू झाले व १९१६ साली सैबेरियन रेल्वेची सुरुवात झाली. मॉस्को ते व्लादिवोस्तोक हे अंतर ही रेल्वेगाडी ६ दिवस व ४ तासांत पूर्ण करते.

व्लाडिव्होस्टॉकमध्ये सायबेरियन रेल्वेचे टर्मिनस
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत