त्यांजिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
त्यांजिन
天津
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

Tianjin montage.jpg
घड्याळाच्या दिशेने वरपासून : चिनवान चौक, त्यांजिन फायनॅन्शियल सेंटर आणि हाय नदी, शीकाय चर्च, त्यांजिन नगरकेंद्राची आकाशरेखा, त्यांजिन रेल्वे स्टेशन, "त्यांजिन आय" चक्र.
त्यांजिन is located in चीन
त्यांजिन
त्यांजिन
त्यांजिनचे चीनमधील स्थान

गुणक: 39°8′N 117°11′E / 39.133°N 117.183°E / 39.133; 117.183

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३४०
क्षेत्रफळ ११,७६० चौ. किमी (४,५४० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,१७,६०,०००
  - घनता १,००० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.tj.gov.cn/


त्यांजिन (देवनागरी लेखनभेद: त्यांचिन ; चिनी: 天津 ; फीनयीन: Tiānjīn ) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरी क्षेत्रांपैकी हे एक महानगरी क्षेत्र आहे. हे महानगर हाय नदीच्या तीरावर वसले असून याच्या पूर्वेस पिवळ्या समुद्राचा भाग असलेले बोहाय आखात पसरलेले असून उर्वरीत बाजूंस याच्या सीमा हपै प्रांतास आणि पैचिंग महानगरी क्षेत्रास भिडल्या आहेत.

लोकसंख्येच्या निकषानुसार षांघाय, पैचिंग, क्वांग्चौ या महानगरांपाठोपाठ त्यांजिन चौथे मोठे महानगर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)