शिंच्यांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिंज्यांग
新疆维吾尔自治区
شىنجاڭ ئۇيغۇر ئاپتونوم رايونى
चीनचा प्रांत

शिंज्यांगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
शिंज्यांगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी उरुम्छी
क्षेत्रफळ १६,६०,००१ चौ. किमी (६,४०,९३० चौ. मैल)
लोकसंख्या २,०९,५२,०००
घनता ११.८ /चौ. किमी (३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-XJ
संकेतस्थळ http://www.xinjiang.gov.cn/

शिंच्यांग स्वायत्त प्रदेश (मराठी लेखनभेद: शिंच्यांग, शिंज्यांग ; पारंपरिक चिनी लिपी: 新疆 ; फिन्यिन: Xīnjiāng ; उय्गुर: شىنجاڭ ئۇيغۇر ئاپتونوم رايونى ;) हा चीन देशाचा आकाराने सर्वात मोठा राजकीय विभाग व एक स्वायत्त प्रदेश आहे. चीनच्या पश्चिम व वायव्य कोपऱ्यात वसलेल्या ह्या प्रदेशासोबत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकस्तानमंगोलिया ह्या देशांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत.

अनेकदा मध्य आशियामध्ये गणल्या जाणाऱ्या शिंच्यांग प्रदेशातील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. उरुम्छी ही शिंच्यांगाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


गेल्या काही वर्षांपासून येथील उईघुर मुस्लिम जनता चीन पासून हा प्रदेश स्वतत्र म्हणून मागणी करत आहे. उईघुर मुस्लिम अतिरेकी संघटना देखील वरचेवर काहींना काही घातपात करत असते. येथील मुस्लिम जनतेचे असे म्हणणे आहे कि त्यांच्यावर चीन देश आपले कायदे थोपवत आहे. किंबहुना येथील मुस्लिम समाजाला पुरुषांना दाढी ठेवण्यास आणि टोपी घालण्यास मनाई आहे आणि मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालण्यास मनाई आहे. आणि असे केल्यास चीन ह्या देशाचा कायदा भंग केला असे समजले जाते आणि संबधीत व्यक्तीला दंड आणि शिक्षा ठोठावली जाते.तर अश्या अनेक काहीना काही कारणांमुळे येथील बहुसंख्य चिनी मुस्लिम जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.