Jump to content

बीजिंग–शांघाय द्रुतगती रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
बीजिंग—शांघाय द्रुतगती रेल्वे
स्थानिक नाव 京沪高速铁路
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश चीन
स्थानके २४
प्रवासी संख्या २१ कोटी दरवर्षी (२०१९ साली)
कधी खुला ३० जून २०११
मालक चीन रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,३१८ किमी (८१९ मैल)
गेज १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३५० किमी/तास
मार्ग नकाशा

बीजिंग—शांघाय द्रुतगती रेल्वे (चिनी: 京沪高速铁路; जिंगजू द्रुतगती रेल्वे) हा चीन देशामधील एक प्रमुख द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. १,३१८ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग चीनची राजधानी बीजिंगला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या शांघायसोबत जोडतो. ह्या रेल्वेमार्गाचे बांघकाम २००८ मध्ये सुरू झाले व ३० जून २०११ रोजी ह्या मार्गावरील पहिली रेल्वेगाडी धावली.

प्रवासी संख्येच्या दृष्टीने बीजिंग-शांघाय मार्ग जगातील सर्वात वर्दळीचा असून २०१९ साली २१ कोटी प्रवाशांनी ह्या रेल्वेने प्रवास केला. ह्या मार्गावर ३५० किमी/तास इतक्या कमाल तर २९२ किमी/तास इतक्या सरासरी वेगाने धावणारी द्रुतगती रेल्वे बिजिंग ते शांघाय दरम्यानचे १३०२ किमी अंतर ४ तास १८ मिनिटांत पार करते. आजच्या घडीला ह्या मार्गावर दररोज सुमारे ९० गाड्या धावतात.

इतिहास

[संपादन]

बीजिंग ते शांघायदरम्यान पहिली रेल्वे १९१२ साली धावली. १९३३ सालापर्यंत ह्या प्रवासाला सुमारे ४४ तासांचा कालावधी लागत असे. चीन सरकारने ह्या मार्गावर अनेक सुधारणा केल्या व रेल्वेचा सरासरी वेग वाढत राहिला. जपानमधील शिनकान्सेनच्या प्रचंड यशानंतर जगभर द्रुतगती रेल्वेसेवा लोकप्रिय होऊ लागली. २००६ साली बीजिंग-शांघाय ह्या रेल्वेप्रवासाला सुमारे ८ तास लागत असत. चीन सरकारने २००६ साली बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेस संमती दिली व २००८ साली ह्या मार्गाचे बांधकाम सुरू झाले. हा द्रुतगती रेल्वेमार्ग साधारणपणे जुन्या रेल्वेमार्गाला समांतर धावतो. २०१० साली बांधून पूर्ण झालेल्या ह्या रेल्वेमार्गावर २४४ पूल तर २२ बोगदे आहेत. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेमार्गावरील {{nowrap|१६४.८-किलोमीटर-long (१०२.४ मैल)} इतकी लांबी असलेला दानयांग-कुन्शान पूल हा जगातील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. तसेच ११३.७ किमी लांबी असलेला त्यांजिन पूल देखील ह्याच मार्गावर बांधण्यात आला आहे.

हा मार्ग चालू झाल्यानंतरच्या काळात दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे १.६५ लाख इतकी होती. तेव्हापासून बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेची लोकप्रियता सातत्याने वाढत असून २०१७ साली दैनंदिन प्रवाशांचा आकडा ५ लाखावर पोचला होता. २०१६ साली ह्या रेल्वेचा महसूल सुमारे ३६० कोटी अमेरिकन डॉलर्स तर निव्वळ नफा १०० कोटी डॉलर्स इतका होता. आजच्या घडीला बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे जगातील सर्वाधिक नफा कमावणारी रेल्वेकंपनी आहे.

प्रमुख शहरे

[संपादन]

इंजिन व डबे

[संपादन]
सीआरएच३८०ए प्रणालीच्या गाडीचे विद्युत इंजिन

बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेसाठी सीआरआरसी ह्या चिनी बनावटीच्या सीआरएच८०० प्रणालीच्या गाड्या वापरल्या जातात. ह्या गाडीला ८ डबे असून तिचा कमाल वेग ३८० किमी/तास इतका आहे.

बाह्य दुवे

[संपादन]