निकोलस ग्रँट बिल्सन कूक (१७ जून, १९५६:लेस्टर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९८३ ते १९८९ दरम्यान १५ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.