उत्तर रेल्वे क्षेत्र
(उत्तर रेल्वे (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
उत्तर रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे असून जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्ये तसेच चंदीगढ व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
दिल्ली उपनगरी रेल्वे सेवा उत्तर रेल्वेद्वारेच चालवली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधण्यात येत असलेली काश्मीर रेल्वे देखील उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत आहे.