पश्चिम एक्सप्रेस
पश्चिम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते पंजाबच्या अमृतसर स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या पश्चिम एक्सप्रेसला मुंबई ते अमृतसर दरम्यानचे १,८२१ किमी अंतर पार करायला ३१ तास लागतात. या ट्रेनचा डाउन क्रमांक १२९२५ आणि अप क्रमांक १२९२६ आहे. ही ट्रेन आठवड्यातील सातही दिवस धावते.
इतिहास
[संपादन]या गाडीला पश्चिम सुपर डिलक्स एक्सप्रेस या नावानेही ओळखतात.[१] ही गाडी मुंबई सेंट्रल स्टेशन मधून बांद्रा टर्मिनस कडे वर्ग झालेल्या गाड्यांपैकी एक आहे. परतीच्या प्रवासासाठी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १२९२६ म्हणून निघते तेव्हा हजरत निजामूद्दीन स्टेशनवर ही थांबत नाही.
बोगी
[संपादन]पश्चिम एक्सप्रेस या ट्रेनला १ ए/सी प्रथम वर्ग, ३ ए/सी २ टायर, ५ ए/सी ३ टायर, ८ शयन यान वर्ग, ३ सामान्य विनाआरक्षित बोगी आणि ४ सामान सुविधेसह सामान्य बोगी आहेत. ट्रेन क्रमांक २२९२५/२२९२६ च्या कळका साठी जाणाऱ्या ट्रेनच्या बोगींचा यात समावेश आहे. या ट्रेन मध्ये खान पान व्यवस्था आहे. भारतीय रेल्वेचे सुविधा नुसार रेल्वेचे अधिकारात बोगीचे व्यवस्थेत मागणीनुसार बदल केला जातो.[२] त्यात रेक /बोगी LOCO-RMS-GEN-S6-S5-S4-S3-S2-S1-PC-B4-B3-B2-B1-A2-A1-H1-GEN-GEN-SLR-S7-S8-B5-A3-SLR. यांचा समावेश आहे.
तपशील
[संपादन]गाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१२९२५ | मुंबई वांद्रे टर्मिनस – अमृतसर | ११:३५ | १९:२० | रोज |
१२९२६ | अमृतसर – वांद्रे टर्मिनस | ०८:१० | १४:४५ | रोज |
सुविधा
[संपादन]पश्चिम एक्सप्रेस ही ट्रेन मुंबई – अमृतसर-कळका असी धावते. या ट्रेनचे अंबाला कॅंटॉन्मेंट जंक्शन स्टेशनवर विभाजन होते. रोज धावणारी क्रमांक १२९२५ ही ट्रेन ३१ तास आणि ४५ मी. आणि क्रमांक १२९२६ ही ३० तास व ३५ मी.त १८२१ किमीअंतर तोडते. या ट्रेनचा सरासरी तासी ५७.३५ की.मी आणि ५९.५४ की.मी अनुक्रमे वेग आहे. तसेच जाने आणि येणे या प्रवासाचा सरासरी वेग तासी ५८-४३ किमीआहे
इंजिन (Traction)
[संपादन]दि.५ फेब्रुवारी २०१२ रोजी पश्चिम रेल्वेने DC इलेक्ट्रिक इंजिन ऐवजी AC इंजिन या ट्रेनसाठी वापरात आणले. सध्या गाझियाबाद येथील वाप (WAP) ७ आणि वाप (वाप) ५ चे इंजिनचे मदतीने या ट्रेनचा पूर्ण प्रवास केला जातो.
वेळा पत्रक
[संपादन]या ट्रेनचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
स्टेशन कोड | स्टेशन नाव | १२९२५-बांद्रा टर्मिनस ते अमृतसर | प्रवास अंतर | दिवस | १२९२६-अमृतसर ते बांद्रा टर्मिनस[३] | प्रवास अंतर | दिवस | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आगमन | गंतव्य | आगमन | गंतव्य | ||||||
BDTS | वांद्रे टर्मिनस | आरंभ | १२.०१ | ० | १ | १४.४5 | सेवट | १८२१ | २ |
BRC | वडोदरा रेल्वे स्थानक | १८.०३ | १८.१३ | ३८१ | १ | ८.१५ | ८.२५ | १४४० | २ |
RTM | रतलाम रेल्वे स्थानक | २२.२ | २२.३ | ६४२ | १ | ४.01 | ४.२ | ११७९ | २ |
KOTA | कोटा रेल्वे स्थानक | २.०५ | २.१५ | ९०९ | २ | २३.३५ | २३.४५ | ९१३ | १ |
GGC | गंगापूर सिटी | ४.४ | ४.४२ | १०८१ | २ | २१.१५ | २१.१७ | ७४१ | १ |
NDLS | नवी दिल्ली रेल्वे स्थानक | १०.४ | ११.०५ | १३७३ | २ | १६.२५ | १६.५ | ४४८ | १ |
UMB | अंबाला छावणी रेल्वे स्थानक | १४.४ | १४.५ | १५७२ | २ | १२.३५ | १३.०५ | २५० | १ |
ASR | अमृतसर रेल्वे स्थानक | १९.२ | सेवट | १८२१ | २ | प्रारंभ | ८.१ | ० | १ |
मार्ग आणि थांबे
[संपादन]या ट्रेनचे जे थांबे आहेत त्या स्थांनकांची कोडसह खालील प्रमाणे नावे आहेत.[४] त्यात प्रारंभिचे बांद्रा टर्मिनस(BDTS) स्थानकानंतर अंधेरी(ADH), बोरीवली(BVI), डहाणू रोड, (DRD) वापी(VAPI), वलसाड, (BL) नवसारी,(NVS), सूरत,(ST) भरूच जंक्शन(BH), वडोदरा जंक्शन,(BRC), गोधरा जंक्शन(GDA), दाहोड(DHD), मेघनगर(MGN), रतलाम जंक्शन(RTM), नागदा जंक्शन(NAD), शामगड(SGZ), रामगंज मंडी(RMA), कोटा जंक्शन(KOTA), सवाई माधोपुर(SWM), गंगापूर सिटी(GGC), हिन्दौम सिटी(HAN). बयाणा जंक्शन(BXN), भारतपुर जंक्शन(BTE), मथुरा जंक्शन(MTJ), फरीदाबाद(FDB), हजरत निजामूद्दीन, न्यू दिल्ली(NDL), सबजी मंडी(SZM), सोनिपत(SNP), पानीपत जंक्शन(PNP), करणाळ(KUN), कुरुक्षेत्र जंक्शन(KKDE), अंबाला कॅंटॉन्मेंट जंक्शन(UMB), अंबाला सिटी(UBC), सिरहिंद जंक्शन(SIR), खन्ना(KNN), लुधियाना जंक्शन(LDH), फगवारा जंक्शन(PGW), जालंधर कॅंटॉन्मेंट(JRC), जालंधर सिटी(JUC), बियास(BEAS), अमृतसर जंक्शन(ASR).[५]
या ट्रेनचा बांद्रा टर्मिनस मधून १२.०० या वेळेवर प्रारंभ झाल्यानंतर दुसरे दिवशी १९.२० वाजता अमृतसर येथे पोहचते.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ "अबाऊट १२९२६/२५ पश्चिम एक्सप्रेस". 2017-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-01 रोजी पाहिले.
- ^ "इंडियन रेल्वेस फॅकट्स : फेमस ट्रेन्स ऑफ इंडियन रेल्वे".
- ^ "पश्चिम एक्सप्रेस /१२९२६ पश्चिम एक्सप्रेस /अमृतसर (ASR) टू बांद्रा टर्मिनस मुंबई (BDTS)".
- ^ "पश्चिम एक्सप्रेस रूट, टाईम टेबल शेड्युल 12925". 2016-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-01 रोजी पाहिले.
- ^ "पश्चिम एक्सप्रेस (12925) रनिंग स्टेटस".[permanent dead link]
- ^ "रनिंग स्टेटस ऑफ पश्चिम एक्सप्रेस (12925)".