वडोदरा रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वडोदरा
भारतीय रेल्वे स्थानक
Vadodara Junction.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता वडोदरा, गुजरात
गुणक 22°18′39″N 73°10′51″E / 22.31083°N 73.18083°E / 22.31083; 73.18083
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
वडोदरा-अहमदाबाद मार्ग
वडोदरा-छोटाउदेपूर मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६१
विद्युतीकरण होय
संकेत BRC
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
वडोदरा is located in गुजरात
वडोदरा
वडोदरा
गुजरातमधील स्थान

वडोदरा जंक्शन (गुजराती: વડોદરા રેલ્વે સ્ટેશન) हे गुजरात राज्यामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मुंबई-दिल्ली ह्या प्रमुख मार्गावर असलेल्या वडोदरा स्थानकामध्ये दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात.

वडोदरा स्थानकाची निर्मिती महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांच्या हुकुमावरून इ.स. १८६१ मध्ये बॉम्बे, बरोडा ॲन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे ह्या कंपनीद्वारे करण्यात आली.

गाड्या[संपादन]

वडोदराहून मुंबईकडे रोज १४ प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. वडोदरा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस, मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, कर्णावती एक्सप्रेस, सौराष्ट्र एक्सप्रेस, कच्छ एक्सप्रेस, सूर्यनगरी एक्सप्रेस, सयाजीनगरी एक्सप्रेस इत्यादी अनेक प्रसिद्ध गाड्या वडोदराला मुंबईसोबत जोडतात. पुण्यासाठी वडोदरावरून अहिंसा एक्सप्रेस, पुणे−इंदूर एक्सप्रेस सुटतात.