डॉज बॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉजबॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
डॉजबॉल खेळताना खेळाडू

डॉज बॉल हा एक मैदानी खेळ आहे. या खेळात फूटबॉलचा चेंडू वापरला जातो.

क्रीडांगण[संपादन]

  • ३६० मीटर त्रिज्येचे वर्तुळ.

खेळाचे स्वरूप व नियम[संपादन]

दोन्ही संघाचे प्रत्येकी ११ खेळाडू असतात - यांपैकी ९ खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात उतरवले जातात, तर २ खेळाडू राखीव असतात.

डॉज बॉल सामन्यात प्रत्येकी ५ मिनिटांचे ४ डाव असतात. दोन डावांच्या मध्ये ५ मिनीटांची विश्रांती असते. नाणेफेक जिंकणारा संघ आक्रमण किंवा संरक्षण याची निवड करतो. आक्रमण करणारे खेळाडू वर्तुळाच्या कडेवर समान अंतरावर उभे असतात. संरक्षक संघातील ३ खेळाडू मैदानात येतात. खेळ सुरू झाल्याबरोबर आक्रमण करणारे खेळाडू संरक्षक खेळाडूस चेंडूने मारण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नात चेंडू जमिनीस न लागता सरळ संरक्षक खेळाडूच्या गुडघ्याच्या वर लागल्यास संरक्षक खेळाडू बाद होतो. ३-३ च्या गटाने संरक्षक खेळाडू खेळतात. प्रत्येक बाद खेळाडूमागे आक्रमक संघास १ गुण मिळतो. प्रत्येक संघ दोन वेळा आक्रमण व दोन वेळा संरक्षण करतो. सर्वाधिक गुण मिळविणारा संघ सामन्यात विजयी ठरतो.