पायचीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पायचीत होणे हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा प्रकार आहे.

फलंदाज पायचीत ठरण्यासाठी पंच खालील नियम वापरतात.

१. चेंडूचा टप्पा लेग-स्टम्पच्या बाहेर पडला होता का?

हो - फलंदाज नाबाद.

नाही - पुढील नियम पहा.

२. चेंडूचा आघात आधी पायाला झाला की बॅटला?

बॅट - फलंदाज नाबाद.

पाय - पुढील नियम पहा.

३. चेंडूचा आघात फलंदाज व गोलंदाजाकडील यष्टींच्या मध्ये झाला?

नाही (ऑफ स्टम्पच्या बाहेर).

फलंदाजाने आपल्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता?
हो - फलंदाज नाबाद.
नाही - नियम ४ पहा.

हो - नियम ४ पहा.

४. पंचाच्या मते जर पायाला न लागता चेंडू पुढे गेला असता तर तो यष्टीला लागला असता?

हो - फलंदाज बाद. नाही - फलंदाज नाबाद.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.