यष्टिचीत
Appearance
क्रिकेटच्या खेळात यष्टिचीत(stumped-out) हा फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.
यष्टिचीत होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे -
- टाकलेला चेंडू नो-बॉल असता कामा नये. वाईड चेंडू चालतो.
- खेळत असलेला फलंदाज धाव काढण्याचा प्रयत्न सोडून अन्य कारणास्तव आपली क्रीझ सोडून पुढे गेलेला असला पाहिजे.
- चेंडू बॅटला न लागता यष्टिरक्षकाकडे गेला पाहिजे.
- फलंदाज धाव काढण्याच्या प्रयत्नात असता कामा नये. असे असल्यास फलंदाज धावचीत समजला जाईल.
- यष्टिरक्षकाने चेंडू यष्टीवर फेकून मारून अथवा चेंडू हातात ठेवून आपल्या त्याच हाताने यष्टी मोडली पाहिजे.
- या क्षणी फलंदाज क्रीझच्या बाहेर पाहिजे.
यष्टिचीत झालेल्या फलंदाजाबद्दल गोलंदाजाला व यष्टिरक्षकाला श्रेय देण्यात येते.