खेळपट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट खेळपट्टी

क्रिकेट ह्या खेळात, क्रिकेट खेळपट्टी म्हणजे क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी विकेटच्या मधील एक २०.१२ मी (२२ यार्ड) लांब आणि ३.०५ मी (१० फूट रुंद) पट्टी होय. खेळपट्टीचा पृष्ठभाग हा सपाट आणि सामान्यत: अत्यंत लहान गवताने अच्छादलेला असतो.

जगात काही ठिकाणी हौशी सामन्यांसाठी कृत्रिम खेळपट्टी वापरली जाते. ही खेळपट्टी म्हणजे कथ्याची मॅट किंवा कृत्रिम टर्फ अंथरलेले काँक्रिटच्या स्लॅबपासून बनवलेली असते, काही वेळा काथ्याच्या मॅट किंवा चटईवर माती टाकली जाते जेणेकरुन ती अस्सल खेळपट्टी वाटू शकेल. परंतू व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृत्रिम खेळपट्टी दुर्मिळ आहे. ज्या ठिकाणी क्रिकेट सामान्यतः खेळले जात नाही अशा ठिकाणी एखादा प्रदर्शनीय सामना अशी खेळपट्टीवर खेळवला जावू शकतो.

खेळपट्टीवर क्रिकेटच्या नियमांमध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे क्रीस आखलेले असतात.

विकेट हा शब्द सहसा खेळपट्टीच्यता संदर्भात उद्भवतो. परंतू क्रिकेटच्या नियमांनुसार (नियम ७ मध्ये खेळपट्टी आणि नियम ८ विकेट, त्यामधील फरक दर्शवतात) तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. क्रिकेट खेळाडू, चाहते आणि समालोचक त्याचा वापर कोणत्याही शक्य संदिग्धतेशिवाय संदर्भांमध्ये करतात. ट्रॅक हा खेळपट्टीसाठी आणखी एक समानार्थी शब्द आहे.

क्रिकेटमैदानाच्या मध्यभागी खेळपट्टीसाठी वापरल्या जाणार्‍या क्षेत्राला स्क्वेअर असे म्हणतात. क्रिकेटची खेळपट्टी ही सहसा व्यावहारिकदृष्ट्या दक्षिणोत्तर दिशेने असते, कारण तसे नसल्यास दुपारच्यावेळी सुर्यामुळे पश्चिमेकडे तोंड असलेल्या फलंदाजाला ते धोकादायक असू शकते.[१]

A wicket consists of three stumps that are placed into the ground, and topped with two bails.
A perspective view of the cricket pitch from the bowler's end. The bowler runs in past one side of the wicket at the bowler's end, either 'over' the wicket or 'round' the wicket.
The Cricket pitch dimensions


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ओरिएंटेशन ऑफ आऊटडोअर प्लेइंग एरियाज. पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकार, क्रीडा आणि मनोरंजन विभाग (७ ऑगस्ट २०१३). २१ मार्च २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)