कामीय पिसारो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कामीय पिसारो
Camille Pissarro - Self-portrait - Tate Britain.jpg
पिसारोने काढलेले स्वतःचे व्यक्तिचित्र (१९०३)
पूर्ण नावजाकोब कामीय पिसारो
जन्म जुलै १०, १८३०
शार्लोट अमाली, सेंट थॉमस, यु.एस. व्हर्जिन आयलॅंड्स
मृत्यू नोव्हेंबर १३, १९०३
एरान्यी-सुर-एप्त, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच Flag of France.svg
कार्यक्षेत्र चित्रकला
शैली दृक्‌ प्रत्ययवाद

याकोब-आब्राहम-कामीय पिसारो ऊर्फ कामीय पिसारो (फ्रेंच: Camille Pissarro) (जुलै १०, १८३० - नोव्हेंबर १३, १९०३) हा प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. पिसारोचे दृक् प्रत्ययवाददृक् प्रत्ययोत्तरवाद चित्रशैल्यांमधील योगदान महत्त्वाचे मानले जाते.

जीवन[संपादन]

पिसारोचा जन्म जुलै १०, १८३० रोजी कॅरिबियन समुद्रातील सेंट थॉमस, व्हर्जिन बेटे येथे झाला. बालपण सेंट थॉमस बेटावर काढल्यावर पिसारो वयाच्या १२ व्या वर्षी पॅरिसात बोर्डिंग शाळेत दाखल झाला. १८५५ साली त्याने पॅरिसातील एकोल दि बो-आऱ्ह व अकाडेमी स्विस या नामांकित कलाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेतले. फ्रॅंको-प्रशियन युद्धामुळे १८७० साली फ्रान्स सोडून लंडनात आसरा घ्याव्या लागलेल्या पिसारोने तेथील वास्तव्यात दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीच्य ढंगाने अनेक चित्रे चितारली. पुढे १८९० साली तो मायदेशी परतला. नोव्हेंबर १३, १९०३ रोजी पॅरिसातील वास्तव्यात पिसारो मरण पावला.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: