द्वारकानाथ संझगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्वारकानाथ संझगिरी (जन्म : १५ नोव्हेंबर) हे प्रामुख्याने क्रिकेटवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. मुंबईतून किंग जाॅर्ज हायस्कूल, रुईया काॅलेजमधून शिकल्यावर, त्यांनी माटुंग्याच्याच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग केले. मुंबई महापालिकेतून ते मुख्य अभियंता म्हणून ते निवृत्त झाले. क्रिकेट आणि अन्य खेळ, चित्रपट, प्रवास, पर्यटन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर द्वारकानाथ यांचे लेख मराठी-इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांमधून १९८० सालापासून प्रकाशित होत आहेत.

द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अफलातून अवलिये (व्यक्तिचित्रणे)
  • आठवणींचा रिव्हर्स स्वीप (आठवणी)
  • इंग्लिश ब्रेकफास्ट
  • क्रिकेट काॅकटेल (क्रिकेटविषयक)
  • क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स (क्रिकेटविषयक)
  • खुल्लमखिल्ली
  • चॅम्पियन्स (क्रीडाविषयक) : १६ क्रिकेटपटूंची व्यक्तिचित्रे
  • चित्तवेधक विश्वचषक २००३ (क्रिकेटविषयक)
  • चिरंजीव सचिन (व्यक्तिचित्रण)
  • तानापिहिनिपाजा (आत्मकथन)
  • तिरकटधा (चित्रपटविषयक)
  • थर्ड अंपायर
  • दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी (मुलाखती)
  • पॉवर प्ले (क्रीडाविषयक)
  • पूर्व अपूर्व (प्रवासवर्णन)
  • फाळणीच्या देशांत (प्रवासवर्णन)
  • फिरता-फिरता (प्रवासवर्णन)
  • ब्लू लगून (क्रिकेटविषयक)
  • भटकेगिरी (प्रवासवर्णन)
  • माझी मुलुखगिरी
  • माझी बाहेरख्याली (प्रवासवर्णन)
  • माझी बाहेरख्याली
  • वल्ली आणि वल्ली (व्यक्तिचित्रणे)
  • स.न.वि.वि. - पत्रास कारण की...(काल्पनिक विनोदी पत्रे)
  • संवाद लिजंड्सशी (व्यक्तिचित्रणे)
  • स्टंप व्हिजन (क्रिकेटपटूंची चरित्रे)

द्वारकानाथ संझगिरी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • दत्ता हलसगीकर साहित्य पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा साहित्यिक पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार
  • विद्याधर गोखले साहित्य पुरस्कार
  • क्रीडाविषयक लेखनासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार
  • वृत्तपत्र लेखन संघाचा पुरस्कार